Posts

Showing posts with the label abhang

pandhari ye nagari janu vaikunth bhuvari | पंढरी ये नगरी lyrics

Image
pandhari ye nagari janu vaikunth bhuvari | पंढरी ये नगरी lyrics छोटा परिचय  पंढरपूर, महाराष्ट्रातील एक अद्वितीय आणि पवित्र शहर, जे थेट वैकुंठलोकाप्रमाणे पृथ्वीवर अवतरले आहे. भगवान विठ्ठलाची ही नगरी चंद्रभागा नदीच्या रमणीय वेढ्यात वसलेली आहे. येथे सतत टाळ आणि मृदुंगाच्या सुमधुर ध्वनीने वातावरण भारलेले असते. याच पवित्र स्थळी संत तुकाराम महाराजांना प्रत्यक्ष विठ्ठलाचे दर्शन झाले, अशी श्रद्धा आहे. पंढरपूर केवळ एक भौगोलिक स्थान नसून, ते लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचे केंद्र आहे, जिथे भक्ती आणि अध्यात्माचा अनुभव मिळतो. #पंढरपूर #विठ्ठल #वैकुंठ #महाराष्ट्र #भक्ती #वारकरी #चंद्रभागा #तुकाराम #आध्यात्म पंढरी ये नगरी जणू वैकुंठ भूवरी विठुरायाची नगरी ।। भोवती भिवरेचा वेढा  मधे पंढरीचा हुडा ।। गस्त फिरे चहुकोनी  टाळ मृदुंगाचा ध्वनी ।। ऐसे स्थळ नाही कोठे  तुकयाला विठ्ठल भेटे ।। पंढरपूर: विठ्ठलाची वैकुंठभूमी, चंद्रभागेच्या कुशीत. टाळ-मृदुंगाचा नाद आणि तुकारामांना भेटलेल्या विठ्ठलाची पावन भूमी. भक्ती आणि अध्यात्माचे केंद्र. #पंढरपूर #विठ्ठल #महाराष्ट्र #भक्ती #मराठी  pandhari ye...

gajar kirtanacha song lyrics lyrics in marathi

Image
gajar kirtanacha song lyrics in marathi  छोटा परिचय : gajar kirtanacha sohala anandacha lyrics या अभंगात एका वारकऱ्याची विठ्ठलावरील गाढ श्रद्धा व्यक्त होते. कीर्तनातून त्याला आत्मिक शांती आणि जीवनाचा खरा अर्थ गवसला. हरी नामाच्या गजरात तो स्वतःला शोधतो आणि त्याचे शरीरच पंढरी व विठ्ठल त्याच्या हृदयात वास करतो. श्वास जपमाळ आणि मन तालवाद्यांच्या रूपात विठ्ठलात तल्लीन होतात. जीव आणि शिव यांचा अभंग मेळ कीर्तनातून साधला जातो, असा भावपूर्ण अनुभव या अभंगात आहे. तुझ्या किर्तनात न्हालो आणि माणसात आलो,  हरी नामाचा गजर केला मला मी घावलो । जन्म झाला वारकरी वाट समजली खरी,  देह देवाची पंढरी. विठू मनाच्या गाभारी,  श्वास झालं जपमाळ, मन चिपळ्यानी टाळ।  मेळ जीवाचा शिवाचा झाला अभंग जिन्याचा,  गजर कीर्तनाचा गजर कीर्तनाचा More Marathi abhang You May Like गोड तुझे नाम गोड तुझे रूप मौन का धरिलें सांगा पांडुरंगा विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी gajar kirtanacha song lyrics in marathi   WhatsApp वर शेअर करा Facebook वर शेअर करा

तुकोबाची अमृत वाणी देवाजीच्या पडता कानी lyrics

 अभंग  तुकोबाची अमृत वाणी देवाजीच्या पडता कानी  तुकोबाची अमृत वाणी देवाजीच्या पडता कानी  दगडाच्या टाळामधुनी गायीले अभंग || द्रौपदीची साडी भरली लाज पतीची सावरली देवकीला सोडविले फोडुनी तुरुगां || कबीराचे शेले विणसी कुंभराची माती खणशी भगीरतासाठी आणली स्वर्गाहुनी गंगा || निळा म्हणे जगजेठी कायी नको माझ्यासाठी भक्त पुंडलीका साठी ऊभा राही प्रंसगा ||

पुण्य फ़ळलें बहुतां दिवसां lyrics in Marathi

  पुण्य फ़ळलें बहुतां दिवसां । भाग्य उदयाचा ठसा । झालों सन्मुख तो कैसा । सन्तचरण पावलों ॥१॥ आजि फ़िटलें माझे कोडें । भवदुःखाचें सांकडे । कोंदाटले पुढें । परब्रम्ह सांवळें ॥२॥ आलिंगने संताचिया । दिव्य झाली माझी काया । मस्तक हें पायां । वरी त्यांच्या ठेवितां ॥३॥ तुका म्हणे धन्य झालो । सुखें संतांचिया धालों । लोटांगणीं आलों । पुढें भार देखोनी ॥४॥

कृपाळु सज्जन तुम्ही संतजन lyrics in Marathi

  कृपाळु सज्जन तुम्ही संतजन| ऐवढे कृपादान तुमचे मज ||1|| आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा | कींव माझी सांगा काकुळती ||2|| अनाथ अपराधी पतित आगळा | परी पायां वेगळा नका करु ||3|| तुका म्हणे तुम्हीं निरविल्यावरी | मग मज हरी उपक्षेणा ||4||

येई गां तूं मायबापा पंढरीच्या राया lyrics in Marathi

येई गां तूं मायबापा पंढरीच्या राया । तुजविण सीन वाटे क्षीण जाली काया ॥ ध्रु ॥ याती हीन मती हीन कर्म हीन माझे । सर्व लज्जा सांडोनिया शरण आलो तुज ॥१॥ दिनानाथ दीनबंधू नामतुझे साजे । पतितपावन नाम ऐसी ब्रीदावळी गाजे ॥२॥ विटेवरी उभा नीट कटावरी कर । तुका म्हणे हेचि आम्हां ध्यान निरंतर ॥३॥

अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो | Antarangi ranglel swarup mi pahato lyrics in Marathi

Image
अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो | Antarangi ranglel swarup mi pahato lyrics in Marathi  Antrangi Rangale Mi Ajit Kadkade Composer: Anil Vaiti Lyricist: Anil Vaiti छोटा परिचय  वाचा स्वामी समर्थांच्या 'अंतरंगी रंगलेले स्वरूप' या सुंदर भजनाचे बोल. या भक्तिगीतात स्वामींच्या स्वरूपाचे आणि त्यांच्या भक्तांवरील कृपेचे वर्णन आहे. #स्वामीसमर्थ #भजन #मराठीभजन #आध्यात्मिक अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो स्वरूप पाहतो स्वामी माठा मध्ये नांदतो ||ध्रु|| भजन गातो कीर्तन करतो गातो तुझी गाथा पदकमली स्वामीच्या मी ठेवितो माथा स्वामींच्या नामे सारा ब्रह्मांड डोलतो ||१|| आस पूरवा भक्तांची दावी रूप डोळा वाट किती पाहू स्वामी जीव हा भुकेला सत्य वाची सत्य सारे सत्य तूची बोलतो ||२|| स्वामी तव दर्शनाला उतावीळ झालो धरणे धरुनी द्वारे आम्ही तिथे बैसलों भूत बाधा रोगतूनी मुक्त तूची करितो ||३|| 'अंतरंगी रंगलेले स्वरूप' हे भजन स्वामी समर्थांवरील नितांत भक्ती आणि त्यांच्या अस्तित्वाचा अनुभव व्यक्त करते... Antarangi Ranglele Swaroop: Swami Samarth Bhajan Lyrics in Minglish Lyrics in Minglish: Antarangi ...

छंद लागो जीव जीवाला lyrics in Marathi

 छंद लागो जीव जीवाला छंद लागो जीव जीवाला श्री हरी नारायणाचा || ध्रु || लागला तो छंद हरीचा कैवारीतो भक्तजनाचा ||१|| तव नामाचा लागला छंद  जय नारायण हरी गोविंद ||२|| Chand lago jiva jivala  Shree Hari narayanacha || Lagala to Chand Haricha  Kaivairito bhaktjanacha || Tav namacha lagla Chand  Jay Narayan Hari Govind ||

देखिला मी देव चंद्रभागे तिरी lyrics in marathi

 देखीला मी देव चंद्र भागे तीरी देखीला मी देव चंद्र भागे तीरी  उभा विटेवरी पांढुरंग पांढुरंग || जाहले समाधान पाहुनिय डोळा  वैखुंटीचा सावळा मायबाप || नाम त्याचे असे पतित पावन  देई उद्धरून मोक्षधाम || जयदास म्हणे मन माझे डोले  सर्वांघटी बोले नारायणा ||

मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics

Image
मन तृप्त झाले आहे तुझा दर्शने मन तृप्त झाले आहे तुझा दर्शने आता नाही देवा काही अन्य मागणे ||धृ|| तूच वाट दिशा तूच, तूच ध्येय अंती गती पावलांची तूच ,तूच चालणे ||१|| थेंब पाण्या ठाई जयसा कण धुळ रूप तसा अंवश बनलो तव मी जगताजिने ||२|| श्वास तैसा ध्यास माझा सुर तैसे गीत रीत जीवनाची झाली तुझा चींतने ||३||

धाव मोरया धाव पाव रे dhav morya dhav pav re lyrics in marathi

Image
धाव मोरया धाव पाव रे दावी  रूप ते साजिरे मोरया...||ध्रु|| जड झाले लोचन एकदा दे दर्शन  गजानना लंबोदरा रे मोरया रून तुझे मोरया सांग कैसे फेडू  काया ही मालिन माझी चरणाशी अंतरू चंदनापरी झिजूनी गंध तुला लावू  भाव भक्तीची अशी फुले तुला वाहू तरी फिटे नाही पांग रे मोरया ||१|| वेड म्हणा भेटाया  नाही कुठले नाते माय बाप बंधू सखा सारे तूच वाटे मोह माय तुझिया पुढे दुःख सारे खोटे वेड मला लागले देवा तुझा दर्शनाचे  विसरलो मी देहभानारे मोरया ||२||

माझा क्षीण भाग हरपला abhang lyrics

Image
माझा क्षीण भाग हरपला  विठोबा विटेवरी देखिला ||ध्रु|| अवघ्या जन्माचे सार्थक झाले डोळा समचरण देखिले. ||१|| चंद्रभागे तीरी नाचती वारकरी आनंदाने विठ्ठलाच्या नाम गजरी. ||२|| तो सुख सोहळा देवांसी दुर्लभ आम्हासी सुलभ चोखा म्हणे ||३||

गोकुळात रंग खेळतो रंग खेळतो श्री हरी marathi lyrics ajay atul jayesh kale

Image
 गोकुळात रंग खेळतो रंग खेळतो श्री हरी मोहनात दंग राधि का  दंग राधिका भाबडी लावितो लळा शाम सावळा लागला तुझा रंग हा निळा सूर बासरीचा मोहवी मनाला बासरीत या जीव गुंतला सोडवू कसा रे सांग मोहना  जीव प्राण होऊन कान्हा शाम रंग लावून कान्हा सोडून गोकुळ कान्हा जाऊ नको

भवसागर हा पार कराया नाम मुखी ते घ्यावे अभंग Lyrics

Image
बुवा श्री दिप्तेश मेस्त्री रिचत  अभंग भवसागर हा पार कराया नाम मुखी जे घ्यावे हरी नाम मुखी जे घ्यावे  भजनी तव लागावे ||ध्रु|| नाम संकीर्तन साधन हे सोपे जळतील पापे जन्मानतरीचे नारायण जय नारायण जय नारायण श्री हरी ||१|| हरी भजनासी ध्यान धरावे ब्रम्हानंदी तल्लीन व्हावे ||२||                        

धन्य धन्य ते नगर अभंग lyrics

Image
  धन्य धन्य ते नगर  Abhang lyris धन्य धन्य ते नगर   वैकुंठ पंढरपूर ।।धृ।। धन्य धन्य ती चंद्र भागा मध्ये पुंडलिक उभा ।।१।। धन्य धन्य ते वाळवणंट क्रिडा करितो गोविंद ।।२।। धन्य धन्य पंढरीचा वास जेव्हा गाई भानुदास ।।३।। dhanya dhanya te nagar nagar  vaikunth pandhrpur ||  dhanya dhanya ti chandra bhaga  madhe pundalika ubha ||  dhanya dhanya te valvanta  krida krito govind ||  dhanya dhanya pandharicha  vasa  jevha gai bhanudas ||

नाम तुझे, नारायणा अभंग lyrics nam tuze re narayana lyrics

नाम तुझे, नारायणा अभंग नाम तुझे, नारायणा फोडी   पाषाणाला पान्हा  ।। धृ ।। अज्या मेळा पापरासी, तोही गेला वैकुंठाशी।। १ ।। नाम जपले वल्मिकिने, फुटली त्याला दोनी पाने ।। २ ।। ऎसा नामाचा महिमा, तुका म्हणे झाली सीमा ।। ३ ।।

काय सांगों देवा ज्ञानोबाची ख्याती अभंग Lyrics in marathi

 काय सांगों देवा ज्ञानोबाची ख्याती  अभंग काय सांगों देवा ज्ञानोबाची ख्याती ।  वेद म्हैशामुखीं बोलविलें ॥१॥  कोठवरी वानूं याची स्वरूपस्थिती ।  चालविली भिंती मृत्तिकेची ॥२॥  अविद्या मायेचा लागों नेदी वारा ।  ऐसें जगदोद्धारें बोलविलें ॥३॥  नामा ह्मणे यांनीं तारिले पतित ।  भक्ति केली ख्यात ज्ञानदेवें ॥४॥

मंगलारंभी तुझी प्रार्थना अभंग lyrics

Image
  मंगलारंभी तुझी प्रार्थना मंगलारंभी तुझी प्रार्थना वनदीतो मी तव चरणा प्रसन्न व्हा गजवदना ।।धृ।। विघ्ने पळती तुझिया स्मरणा तुजविण शरण मी जाऊ कोना हे गजवदना या तुम्ही स्मरणा आनंद अमुचा मन ।।१।। भक्ती भावे पूजन चाले हर्ष भराने हे मन डोले प्रसन्न होऊन दर्शन द्यावे ही आमुची प्रार्थना ।।२।। हे गजवदना आलो चरणा देवा आलो चरणा आशीर्वाद हो द्या तुम्ही सकळा कृपा तुझी मोरया ।।३।।

पंढरीचा राणा विठ्ठल धनी

पंढरीचा राणा विठ्ठल धनी पंढरीचा राणा विठ्ठल धनी राणी रुक्मिणी सत्यभामा राणी रुक्मिणी पंढरीचा राणा विठ्ठल धनी || भूमिमध्ये गुप्त कान्होपात्रा झाली उजवे बाजू केली लक्ष्मीची पुढे हो प्रतिमा नामदेव पायरी उभा महाद्वारी चोखामेळा राणी रुक्मिणी सत्यभामा राणी रुक्मिणी पंढरीचा राणा विठ्ठल धनी || पुढे मल्लिकाअर्जुन महिमा असे फार लिंग असे थोर महादेवाचे राणी रुक्मिणी सत्यभामा राणीरुक्मिणी पंढरीचा राणा विठ्ठल धनी || पुढे भागीरथी मध्ये पुंडलिक आणिक तेथे वेणू नाद देवाचे समोर नरहरी सोनार हृदयी निरंतर नाव घेतो राणी रुक्मिणी सत्यभामा राणीरुक्मिणी पंढरीचा राणा विठ्ठल धनी ||

जीव हा तळमळे तुझ्याचसाठी अभंग Lyrics

  जीव हा तळमळे तुझ्याचसाठी अभंग जीव हा तळमळे तुझ्याचसाठी कोठे मला भेटशी अनंत युगाच्या नारायणा कोठे मला भेटशी ।। धृ ।। तुझ्या भक्तीची लागली गोडी कृपा करी आम्हा वरी ।। १ ।। चरणी काया ती लोलाया अर्पण मी केली ।। २ ।।

Join whatsapp channel

recent posts

Loading recent posts...