amcho konkan lyrics swarga peksha sundar asa lyrics
आमचो कोकण मालवणी गीत श्रीकृष्ण सावंत स्वर्गापेक्षा सुंदर असा, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला मन तुमचा प्रसन्न होतला मन तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला मन तुमचा प्रसन्न होत मन असो आमचो ह्यो कोकण .... असो आमचो ह्यो कोकण .... रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विसावली गाव | जगाच्या नकाशार शोभून दिसता आमच्या कोकणचा नाव | सह्याद्रीच्या डोंगर रांगातून,फुलला नंदनवन सह्याद्रीच्या डोंगर रंगात ,फुलला नंदनवन ||१|| रामेश्वर आरेश्वर कुणकेश्वर , रवळनाथ वेतोबा | मालेश्वर लिंगेश्वर हरीहरेश्वर राजापुरात अवतरता गंगा | भगवती सातेरी भद्रकाली पावणाई दिरबाई भराडी | जाखमाता विठ्ठलाई नवलाई, भैरी भवानी गावदेवी | राऊळ महाराज साटम महाराज, बालचंद्र महाराज | धर्माधिकारी टेंब्ये स्वामी, स्वामी स्वरूपानंद नरेंद्र महाराज | देवी देवतांका महापुरुषांका, करताव आम्ही वंदन || २ || झुक झुक गाडीत बसान आम्ही करताव बघा हो मज्जा | खिडकी मधून दर्शन देता , आमका निसर्ग राजा | ट...