शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान lyrics in marathi
शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान
महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान ll
गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा
पायात नुपूर छान, आवडते बेलाचे पान ll
जटेतुन वाहे झुळ झुळ गंगा
डोक्यावर चांदोबा छान, आवडते बेलाचे पान ll
महादेवाच्या हातात डमरू त्रिशूल
पायात खडावा छान , आवडते बेलाचे पान ll
बेलपुष्पांवरी शंकराची प्रीती
कपाळाला भस्म शोभे छान, आवडते बेलाचे पान ll
घेऊन रूप भिल्लींण आली
कैलासी नाचत छान , आवडते बेलाचे पान ll
डोळे उघडुन शंकर पही
पार्वती दिसतीया छान , आवडते बेलाचे पान ||
शंकराच्या मांडीवरती गिरिजा गणपती
शोभून दिसतोय छान,आवडते बेलाचे पान ||
Comments
Post a Comment
Jara tumhi kahi shanka astiva kiva kahi suchvyche asel tr tumhi comments krun sangu shakta