तिन्ही सांजा झाल्या गायी घरा आल्या गौळण
तिन्ही सांजा झाल्या गाई घरी आल्या नजर रोखुनी राधा झाली बावरी कसा येईना ग हरी अजुनी || खेळायला सांगुनी गेला भर दुपारी वेळेला अजुनी कैसा येईना वेढा पिसा जीव झाला || घरो घरी राधा शोधूनि आली येता जाता सवंगड्यांना विचारून हरघडी|| कुणी सांगा सांगा ,सांगा हो धडतरी कुणी पहिला का हरी , कुणी पहिला का हरी नामा म्हणे किती छळसी भक्तांना जीव व्यकुळ तुझं वीण हरी ||