Posts

Showing posts with the label allat

बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे lyrics in Marathi

  बोलिले लेकुरे | वेडी वाकुडी उत्तरे ||1|| करा क्षमा अपराध | महाराज तुम्ही सिद्ध ||2|| नाही विचारिला | अधिकार म्यां आपुला ||3|| तुका म्हणे ज्ञानेश्वरा | राखा पायांपे किंकरा ||4||

पुण्य फ़ळलें बहुतां दिवसां lyrics in Marathi

  पुण्य फ़ळलें बहुतां दिवसां । भाग्य उदयाचा ठसा । झालों सन्मुख तो कैसा । सन्तचरण पावलों ॥१॥ आजि फ़िटलें माझे कोडें । भवदुःखाचें सांकडे । कोंदाटले पुढें । परब्रम्ह सांवळें ॥२॥ आलिंगने संताचिया । दिव्य झाली माझी काया । मस्तक हें पायां । वरी त्यांच्या ठेवितां ॥३॥ तुका म्हणे धन्य झालो । सुखें संतांचिया धालों । लोटांगणीं आलों । पुढें भार देखोनी ॥४॥

कृपाळु सज्जन तुम्ही संतजन lyrics in Marathi

  कृपाळु सज्जन तुम्ही संतजन| ऐवढे कृपादान तुमचे मज ||1|| आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा | कींव माझी सांगा काकुळती ||2|| अनाथ अपराधी पतित आगळा | परी पायां वेगळा नका करु ||3|| तुका म्हणे तुम्हीं निरविल्यावरी | मग मज हरी उपक्षेणा ||4||

येई गां तूं मायबापा पंढरीच्या राया lyrics in Marathi

येई गां तूं मायबापा पंढरीच्या राया । तुजविण सीन वाटे क्षीण जाली काया ॥ ध्रु ॥ याती हीन मती हीन कर्म हीन माझे । सर्व लज्जा सांडोनिया शरण आलो तुज ॥१॥ दिनानाथ दीनबंधू नामतुझे साजे । पतितपावन नाम ऐसी ब्रीदावळी गाजे ॥२॥ विटेवरी उभा नीट कटावरी कर । तुका म्हणे हेचि आम्हां ध्यान निरंतर ॥३॥

Join whatsapp channel

recent posts

Loading recent posts...