कृपाळु सज्जन तुम्ही संतजन lyrics in Marathi

 कृपाळु सज्जन तुम्ही संतजन|

ऐवढे कृपादान तुमचे मज ||1||

आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा |
कींव माझी सांगा काकुळती ||2||

अनाथ अपराधी पतित आगळा |
परी पायां वेगळा नका करु ||3||

तुका म्हणे तुम्हीं निरविल्यावरी |
मग मज हरी उपक्षेणा ||4||

Comments

Post a Comment

Jara tumhi kahi shanka astiva kiva kahi suchvyche asel tr tumhi comments krun sangu shakta