Posts

Showing posts with the label Gajar

महाराष्ट्रमध्ये निसर्ग रम्य सुंदर ते कोकण lyrics in marathi

 महाराष्ट्रमध्ये निसर्ग रम्य सुंदर ते कोकण |  या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण ॥धृ॥ महाड चिपळून संगमेश्वर पुढे लांजा राजापूर |  दापोली खेड गुहागर रत्नागिरी जिल्हयावर |  गणेश पुजती लक्ष वेधिती शक्ती तुरा नाचून ॥१॥ खारे पाटण नांदगाव तिठा कणकवली कसाल आणि कट्टा |  कुडाळ-पावशी पांदुरलिटा पुढे मालवण किनार पट्टा ।  गौरी गणपती आणून पुजती घरो घरी सारे जण ॥२॥ ठाणे रायगड-रत्नागिरी पुढे सिंधुदुर्ग नगरी ।  येथे कोकणच्या वस्ती भारी कुणी वसती सागर तीरी ।  गणपती त्यांचे आराध्य दैवत गरीब असो धनवान ॥३॥ दरवरसाला चाकरमानी जाती एसटी करुन घरी।  कोणी कोकण रेल्वे नी कोणी मिळेल ते वाहन करुनी |  वार्षीक उत्सव साजरा करीती गणपतीला भजूनी ॥४॥ अशा कोकणच्या चाली रिती पहाण्या गावास भेटी देती ।  गणपतीची आरती काशिरामाची त्याला पसंती ।  महाराष्ट्राची शान आहे असे हे कोकण ॥५॥

गणांचा तू अधीपती गौरी तनया lyrics in Marathi

         गणांचा तू अधीपती गौरी तनया गणराया गणराया गणराया गणराया बाप्पा मोरया ||ध्रु|| आली भाद्रपद मासी चतुर्थी  तुमचा स्वागतासी बहरली धरती मनो भावे नित्य तुझी भक्ती करूया  ||१|| साऱ्या भक्तांचा तूच कैवारी  तुझी कृपा असे आम्हावरी  रात्रंदिन भक्तिभावे भजन करूया  ||२|| भक्त जनानंचा भाग्यविधाता  सकलकलांचा स्वामी दाता  उमा पुत्र विद्य हरा बुद्धिविधता  ||३||

Durga mate daya tuzi re gajar lyrics krishana pawar

  दुर्गा माते दया तुजीरे भवभय चिंता हारी आंबे आलो तुझ्या दरबारी || कोल्हापूरी तू लक्ष्मी माता माउलवासी अंबा तुळजाभवानी तुळजापूरची तूच असे जगदंबा संतोषी मा दुर्गाकाली तुझीच रूपे सारी आंबे आलो तुझ्या दरबारी || थकले जेथे ब्रम्ह तिथे तू अवतरली काया खेळ जगाचा तुझ्या मुळे तू ब्रह्मची पडछाया तू विश्वाची आहे जननी महिमा ही तवन्यारी आंबे आलो तुझ्या दरबारी || आली विपत्ती जेव्हा जेव्हा धाऊनी तू आली दृष्ट दैत्य हे नष्ट कराया अष्टभुजा तू झाली सिंहावरती स्वार होऊनी महिषासुर सवारी आंबे आलो तुझ्या दरबारी ||

Join whatsapp channel

recent posts

Loading recent posts...