महाराष्ट्रमध्ये निसर्ग रम्य सुंदर ते कोकण lyrics in marathi
महाराष्ट्रमध्ये निसर्ग रम्य सुंदर ते कोकण |
या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण ॥धृ॥
महाड चिपळून संगमेश्वर पुढे लांजा राजापूर |
दापोली खेड गुहागर रत्नागिरी जिल्हयावर |
गणेश पुजती लक्ष वेधिती शक्ती तुरा नाचून ॥१॥
खारे पाटण नांदगाव तिठा कणकवली कसाल आणि कट्टा |
कुडाळ-पावशी पांदुरलिटा पुढे मालवण किनार पट्टा ।
गौरी गणपती आणून पुजती घरो घरी सारे जण ॥२॥
ठाणे रायगड-रत्नागिरी पुढे सिंधुदुर्ग नगरी ।
येथे कोकणच्या वस्ती भारी कुणी वसती सागर तीरी ।
गणपती त्यांचे आराध्य दैवत गरीब असो धनवान ॥३॥
दरवरसाला चाकरमानी जाती एसटी करुन घरी।
कोणी कोकण रेल्वे नी कोणी मिळेल ते वाहन करुनी |
वार्षीक उत्सव साजरा करीती गणपतीला भजूनी ॥४॥
अशा कोकणच्या चाली रिती पहाण्या गावास भेटी देती ।
गणपतीची आरती काशिरामाची त्याला पसंती ।
महाराष्ट्राची शान आहे असे हे कोकण ॥५॥
Comments
Post a Comment
Jara tumhi kahi shanka astiva kiva kahi suchvyche asel tr tumhi comments krun sangu shakta