amcho konkan lyrics swarga peksha sundar asa lyrics

आमचो कोकण

मालवणी गीत 

श्रीकृष्ण सावंत 

स्वर्गापेक्षा सुंदर असा, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण


तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा
प्रसन्न होतला मन तुमचा प्रसन्न होतला मन
तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा
प्रसन्न होतला मन तुमचा प्रसन्न होत मन
असो आमचो ह्यो कोकण ....
असो आमचो ह्यो कोकण ....

रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग
जिल्ह्यात विसावली गाव |
जगाच्या नकाशार शोभून दिसता
आमच्या कोकणचा नाव |
सह्याद्रीच्या डोंगर रांगातून,फुलला नंदनवन
सह्याद्रीच्या डोंगर रंगात ,फुलला नंदनवन ||१||

रामेश्वर आरेश्वर कुणकेश्वर , रवळनाथ वेतोबा |
मालेश्वर लिंगेश्वर हरीहरेश्वर
राजापुरात अवतरता गंगा |
भगवती सातेरी भद्रकाली
पावणाई दिरबाई भराडी |
जाखमाता विठ्ठलाई नवलाई,
भैरी भवानी  गावदेवी |
राऊळ महाराज साटम महाराज,
बालचंद्र महाराज |
धर्माधिकारी टेंब्ये स्वामी, स्वामी स्वरूपानंद नरेंद्र महाराज |
देवी देवतांका महापुरुषांका,
करताव आम्ही वंदन || २ ||

झुक झुक गाडीत बसान आम्ही
करताव बघा हो मज्जा |
खिडकी मधून दर्शन देता ,
आमका निसर्ग राजा |
टेकड्या किल्ले मंदिर बंदरे,
पर्यटकांचा आकर्षण ||३||

कोकणात आमच्या घरोघरी,
गणपतीक लय धमाल |
सप्तो जत्रा अष्टम शिमग्याक,
नाचवतात पालखी कमाल |
चाकरमानी रजा काढून
बघा येती मुंबईवरसून ||४||

जांभळा करवंद फणस काजु ,
नारळ फोपळीच्यो बागो|
कोकणाची शान जगात मिरवता,
देवगड चो हापूस आंबो |
सुपारीची झाडा, कोकमचो आगुळ,
दारात केळीचो बन ||५||

कोकणात आमका लाभलो असा,
समुद्राचो किनारो |
डोंगराच्या कुशीतून व्हावता बघा,
धबधब्या फवारो |
परशुरामाची पावन भूमी,
करतव तिका नमन ||६|| 

कोकणात आमच्या दशावतार,
डबलबारी फेमस |
नमन जाखडी शक्तीतुरा,
नृत्यकला झकास,
परंपरा ही लोककलेची,
जपताव मनापासून ||७||

घावणे आंबोळी शेवये आमका,
आवडता झुणका भाकरी |
कुळदाची पिटी ,दोडये मासे
यांचीच चव लय न्यारी |
सुखो बांगडो मळये मासे ,
कुरल्याचा हो कालवण |
गोलमो बोंबील बोडाये मासे,
शिवल्याचा हो कालवण ||८||

तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा
प्रसन्न होतला मन तुमचा प्रसन्न होतला मन
तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा
प्रसन्न होतला मन तुमचा प्रसन्न होत मन
असो आमचो ह्यो कोकण ....
असो आमचो ह्यो कोकण ....

स्वर्गापेक्षा सुंदर असा, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण

साधी भोळी आम्ही कोकणची माणसा,
जगताव सुखाचो क्षण |

तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा
प्रसन्न होतला मन तुमचा प्रसन्न होत मन
असो आमचो ह्यो कोकण ....
असो आमचो ह्यो कोकण ...

Konkan Marathi Song Lyrics
Konkani Folk Song Lyrics
Asso Amcho Hyo Konkan Lyrics
Marathi Coastal Songs
Marathi Konkani Bhavgeet
Marathi Culture Songs
Traditional Marathi Songs
Marathi Folk Songs Lyrics
Tourism in Konkan
swarga peksha sundar asa lyrics

Comments

recent posts

Loading recent posts...

popular posts

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान lyrics in marathi

गोड तुझे रूप गोड तुझे नाम lyrics in marathi | god tujhe roop god tujhe naam lyrics

Tujhe Naam Ale Othi Lyrics – Ajit Kadkade | भाव अंतरीचे हळवे

धन्य धन्य जन्म ज्याचा अभंग | dhanya dhanya janma jyacha lyrics in marathi

man trupt zale ahe tuzya | मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics in Marathi

मी निघालो तुम्ही येता का | mi nighalo tumhi yeta ka song lyrics | साई भजन lyrics in Marathi

विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी | Vitthal tal vitthal dindi Lyrics in Marathi