काटा रुतला काटा अहंकाराचा lyrics
काटा रुतला रुतला काटा अहंकाराचा
लागुदे छंद हा मानवा
लागूदे छंद हरी भजनाचा ||धृ||
भटकू नको रे भटकू नकोरे इकडे तिकडे तू असा
शडरीपुचा कटा नडला सांग काडशील कसा
तूच तुझा जीवनाचा आहे रे बघ आरसा
भगवंताला विसरू नको रे ऐक खुळ्या तू माणसा ||१||
काटा नाही काढला तर जन्म तुझा जाईल फुका
कर उपाय आता काही राहू नको रे असा मुका
सुखाचे बघ सोबती सारे नसते रे कोणी दुःखा
हीच वेळ आहे तुलारे सुधार तू आपल्या चुका ||२||
शुद्ध मनाने लागावे तू ईश्वराच्या सेवेत
भवसागर हा पार करशील या भक्तीच्या नावेत
हरी भजनात रंगून जारे सोडूनको सत संगत
श्रीधर तुम्हा सांगे उपाय येईल जीवनात रंगत ||३||
Comments
Post a Comment
Jara tumhi kahi shanka astiva kiva kahi suchvyche asel tr tumhi comments krun sangu shakta