संत सनकादिक भक्त मिळाले अनेक lyrics in marathi
संत सनकादिक भक्त मिळाले अनेक ॥ स्वानंदे गर्जती पाहू आले कौतुक ॥ नवल होताहे आरती देवाधिदेवा ॥ स्वर्गीहूनि सुरवर पाहू येताति भावा ॥ नवल होताहे आरती… नरनारी तटस्थ अवघे पडले नयना ॥ ओंवाळिता श्रीमुख धणी न पुरे मना ॥ नवल होताहे आरती… एका जनार्दनी मंगल कौतुके गाती ॥ मंगल आरत्या गाती ॥ मिळाले वैष्णव जयजयकारे गर्जती ॥ नवल होताहे आरती…