संत सनकादिक भक्त मिळाले अनेक lyrics in marathi

 संत सनकादिक भक्त मिळाले अनेक ॥

स्वानंदे गर्जती पाहू आले कौतुक ॥

नवल होताहे आरती देवाधिदेवा ॥
स्वर्गीहूनि सुरवर पाहू येताति भावा ॥

नवल होताहे आरती…

नरनारी तटस्थ अवघे पडले नयना ॥
ओंवाळिता श्रीमुख धणी न पुरे मना ॥

नवल होताहे आरती…

एका जनार्दनी मंगल कौतुके गाती ॥
मंगल आरत्या गाती ॥
मिळाले वैष्णव जयजयकारे गर्जती ॥

नवल होताहे आरती…

Comments