Chala ho pandhari jau abhang lyrics
चला हो पंढरी जाऊ,जिवीच्या जिवलगा पाहू!!धृ!
भिवरे स्नान करुनिया,
संत पद धूळ शिरी लाऊ !!1!!
बोध रुपु तुळशीच्या माळी
श्रवण मनी चंदन हे भाळी
करू मननाची चिपळी
निज ध्यास हरी गाऊ !!2!!
विठु सर्वत्र घनदाट
पंढरी विश्विची पेठ
दुजा नाहिरे वैकुंठ
सदा येथेच दृढ राहू !!3!!
ना मरणे जन्मने आम्हा
ना भेदा भेद ही कामा
म्हणे तुकड्या घनश्यामा
पदम पूजी शीर हे वाहू !!4!!
👍
ReplyDeleteSuper hit abhang
ReplyDelete