maun ka dharile tumhi sanga panduranga abhang lyrics
मौन का धरीले
तुम्ही सांगा पांडुरंगा ||धृ||
तुकोबाची अमृत वाणी देवाजीच्या पडता कानी
दगडाच्या टाळामधुनी गायीले अभंग ||
द्रौपदीची साडी भरली लाज पतीची सावरली
देवकीला सोडविले फोडुनी तुरुगां ||
कबीराचे शेले विणसी कुंभराची माती खणशी
भगीरतासाठी आणली स्वर्गाहुनी गंगा ||
निळा म्हणे जगजेठी कायी नको माझ्यासाठी
भक्त पुंडलीका साठी ऊभा राही प्रंसगा ||
Comments
Post a Comment
Jara tumhi kahi shanka astiva kiva kahi suchvyche asel tr tumhi comments krun sangu shakta