Posts

झाली कीर्तनाची दाटी abhang lyrics

Image
झाली कीर्तनाची दाटी चंद्रभागे वाळवंटीं ।। १ ।। भक्त कीर्तन गर्जती हरिची नामें नाना छंदै ।। २ ।। टाळ मृदंग झणकार नामे कोदलें अंबर ॥ ३ ॥ निळा म्हणे वैकुंठवासी झाला दुर्लभ हरिभक्तांसीं ॥ ४ ॥

mazya mana lago chhand abhang Lyrics

Image
 माझ्या मना लागो छंद  नित्य गोविंद गोविंद  !!धृ!!   तेणे निरसेल बंधन  मुखी वदे नारायण  !!1!!   ब्रम्हरुप होई काया  माया जाईल विलया  !!2!!   होय सर्व सुख धनी  चुके जन्म मरण कानी  !!3!!   म्हणे एका जनार्दन  सदा समाधान मन   !!4!!

mushka vari shobhe gan tu मूषकावरी शोभे गण तू lyrics in marathi

 गजानना गणपती जय जय गजानना गणपती मूषकावरी शोभे गण तू निपुरांचा झनकार गणराज गजानन करूया जय जय कार ।।धृ।।      ऐसा गणनाथ गणपती        हाती मोदकांचा वाटी ।।     सिंदूर चर्चित क्रांती शोभे      तुला वंदीतो भक्तीलोभे ।।   ऐसा भक्ता संकटी पावशी   शरणागत मी तवचरणाशी ।।

Chala ho pandhari jau abhang lyrics

Image
 चला हो पंढरी जाऊ,जिवीच्या जिवलगा पाहू!!धृ! भिवरे स्नान करुनिया, संत पद धूळ शिरी लाऊ !!1!! बोध रुपु तुळशीच्या माळी श्रवण मनी चंदन हे भाळी करू मननाची चिपळी निज ध्यास हरी गाऊ     !!2!! विठु सर्वत्र घनदाट पंढरी विश्विची पेठ दुजा नाहिरे वैकुंठ सदा येथेच दृढ राहू       !!3!! ना मरणे जन्मने आम्हा ना भेदा भेद ही कामा म्हणे तुकड्या घनश्यामा पदम पूजी शीर हे वाहू  !!4!! 

Naam gheta utha uthi abhang lyrics in marathi

Image
 नाम घेता उठाउठी, होय संसाराची तुटी || धृ || ऐसा लाभ बांधा गांठी विठ्ठल पायी मिठी || १ || नामापरते साधन नाही जें तू करिसी आणिक कांही || २ || हाकरोनी सांगे तुका नाम घेता राहो नका || ३ ||

Man mohana murali vala gavlan lyrics

Image
lscreen>  नंदाचा अलबेला  मनमोहन मुरलीवाला।    !!धृ!! भक्तासाठी तो जगजेठी कुब्जेशी रथ झाला       !!1!! विदुरा घरच्या भक्षूनी कण्या ब्रम्हानंदे झाला।          !!2!! भक्ती सुखे सुखावला एका जनार्दनीं निर्मला  !!3!!

भाव तोचि देव अभंग lyrics

Image
भाव तोचि देव,भाव तोचि देव संदेह नाही हो,संतांनी हा टाहो फोडीयला //धृ// भावने वाचूनी देव नाही कोठे तीर्थस्थान जरी मोठे झाले    //1// निश्चय करून हृदयात देव ठेविता हा भाव काय वेची   //2// खावे प्यावे ल्यावे,सर्वही करावे परी देव नोव्हे जमाखर्च  कर्तेपण लेले आपुलिया बाधा कर्ता करविता हृदयातु          //3// ऐसें भावनेचे साधन हे मोठे शुभा शुभ लोपे मोकळा तू   //4// ऐसीं भोळी भक्ती देवास आवडे सर्व काही जोडे दत्ता म्हणे    //5//

Join whatsapp channel

recent posts

Loading recent posts...