Posts

नाम तुझे, नारायणा अभंग lyrics nam tuze re narayana lyrics

नाम तुझे, नारायणा अभंग नाम तुझे, नारायणा फोडी   पाषाणाला पान्हा  ।। धृ ।। अज्या मेळा पापरासी, तोही गेला वैकुंठाशी।। १ ।। नाम जपले वल्मिकिने, फुटली त्याला दोनी पाने ।। २ ।। ऎसा नामाचा महिमा, तुका म्हणे झाली सीमा ।। ३ ।।

काय सांगों देवा ज्ञानोबाची ख्याती अभंग Lyrics in marathi

 काय सांगों देवा ज्ञानोबाची ख्याती  अभंग काय सांगों देवा ज्ञानोबाची ख्याती ।  वेद म्हैशामुखीं बोलविलें ॥१॥  कोठवरी वानूं याची स्वरूपस्थिती ।  चालविली भिंती मृत्तिकेची ॥२॥  अविद्या मायेचा लागों नेदी वारा ।  ऐसें जगदोद्धारें बोलविलें ॥३॥  नामा ह्मणे यांनीं तारिले पतित ।  भक्ति केली ख्यात ज्ञानदेवें ॥४॥

मंगलारंभी तुझी प्रार्थना अभंग lyrics

Image
  मंगलारंभी तुझी प्रार्थना मंगलारंभी तुझी प्रार्थना वनदीतो मी तव चरणा प्रसन्न व्हा गजवदना ।।धृ।। विघ्ने पळती तुझिया स्मरणा तुजविण शरण मी जाऊ कोना हे गजवदना या तुम्ही स्मरणा आनंद अमुचा मन ।।१।। भक्ती भावे पूजन चाले हर्ष भराने हे मन डोले प्रसन्न होऊन दर्शन द्यावे ही आमुची प्रार्थना ।।२।। हे गजवदना आलो चरणा देवा आलो चरणा आशीर्वाद हो द्या तुम्ही सकळा कृपा तुझी मोरया ।।३।।

रूप सावळे सुंदर रूपक Lyrics in marathi

रूप सावळे सुंदर रूप सावळे सुंदर  कानी कुंडले मकरा-कार || धृ || तो हा पंढरीचा राणा नकळे योगियांच्या ध्याना || १ || पितांबर वैजयंती माथा मुकुट शोभे दिप्ती || २ || एका जनार्दनी ध्यान विठे पाऊले समान || ३ ||

याचे हातीचा वेणू कुणी घ्यागे गौळण lyrics

याचे हातीचा वेणू कुणी घ्यागे गौळण  याचे हातीचा वेणू कुणी घ्यागे बाई घ्यागे सई घ्यागे ।।धृ।। घरी करीत होते काम धंदा वेणू वाजविले नंदाचिये नंदा विसरले मी काम धंदा ।।१।। घरी सासुचा जाच माझा भारी जावा नंदा नांदती परोपरी ।।२।। तान्हे बालक आले कुणी घरा घरी सासू सासरा म्हातारा याच्या मुरलीने जीव झाला घाबरा ।।३।। वेणू न्हवे विषमज वाटे नाद ऐकता काम मनी दाटे मध्वनाथाची मूर्ती हृदयी भेटे ।।४।।

पंढरीचा राणा विठ्ठल धनी

पंढरीचा राणा विठ्ठल धनी पंढरीचा राणा विठ्ठल धनी राणी रुक्मिणी सत्यभामा राणी रुक्मिणी पंढरीचा राणा विठ्ठल धनी || भूमिमध्ये गुप्त कान्होपात्रा झाली उजवे बाजू केली लक्ष्मीची पुढे हो प्रतिमा नामदेव पायरी उभा महाद्वारी चोखामेळा राणी रुक्मिणी सत्यभामा राणी रुक्मिणी पंढरीचा राणा विठ्ठल धनी || पुढे मल्लिकाअर्जुन महिमा असे फार लिंग असे थोर महादेवाचे राणी रुक्मिणी सत्यभामा राणीरुक्मिणी पंढरीचा राणा विठ्ठल धनी || पुढे भागीरथी मध्ये पुंडलिक आणिक तेथे वेणू नाद देवाचे समोर नरहरी सोनार हृदयी निरंतर नाव घेतो राणी रुक्मिणी सत्यभामा राणीरुक्मिणी पंढरीचा राणा विठ्ठल धनी ||

रामचंद्राची आरती  जय देव जय देव जय आत्मारामा आरती lyrics

 रामचंद्राची आरती  जय देव जय देव जय आत्मारामा जय देव जय देव जय आत्मारामा । निगमागमशोधितां न कळे गुणसीमा ॥ धृ. ॥ नाना देही देव एक विराजे । नाना नाटक लीला सुंदर रुप साजे ॥ नाना तीर्थी क्षेत्री अभिनव गति भाजे । अगाध महिमा पिंडब्रह्मांडी गाजे ॥ १ ॥ बहुरुपी बहुगुणी बहुतां कलांचा । हरिहरब्रह्मादिक देव सकळांचा ॥ युगानुयुगी आत्माराम आमुचा ॥ दास म्हणे महिमा न बोलवे वाचा ॥ २ ॥

Join whatsapp channel

recent posts

Loading recent posts...