मंगलारंभी तुझी प्रार्थना अभंग lyrics
मंगलारंभी तुझी प्रार्थना मंगलारंभी तुझी प्रार्थना वनदीतो मी तव चरणा प्रसन्न व्हा गजवदना ।।धृ।। विघ्ने पळती तुझिया स्मरणा तुजविण शरण मी जाऊ कोना हे गजवदना या तुम्ही स्मरणा आनंद अमुचा मन ।।१।। भक्ती भावे पूजन चाले हर्ष भराने हे मन डोले प्रसन्न होऊन दर्शन द्यावे ही आमुची प्रार्थना ।।२।। हे गजवदना आलो चरणा देवा आलो चरणा आशीर्वाद हो द्या तुम्ही सकळा कृपा तुझी मोरया ।।३।।