याचे हातीचा वेणू कुणी घ्यागे गौळण lyrics
याचे हातीचा वेणू कुणी घ्यागे गौळण याचे हातीचा वेणू कुणी घ्यागे बाई घ्यागे सई घ्यागे ।।धृ।। घरी करीत होते काम धंदा वेणू वाजविले नंदाचिये नंदा विसरले मी काम धंदा ।।१।। घरी सासुचा जाच माझा भारी जावा नंदा नांदती परोपरी ।।२।। तान्हे बालक आले कुणी घरा घरी सासू सासरा म्हातारा याच्या मुरलीने जीव झाला घाबरा ।।३।। वेणू न्हवे विषमज वाटे नाद ऐकता काम मनी दाटे मध्वनाथाची मूर्ती हृदयी भेटे ।।४।।