तुझ्या मुरलीचा एकुन ध्वनी lyrics बुवा संतोष रेडकर

 तुझ्या मुरलीचा एकुन ध्वनी


तुझ्या मुरलीचा एकुन ध्वनी 

कान्हामी आले जशीच्या तशी धावुनि ||धृ||

झाडीत होते माझे मी अंगण
तेथेच राहिली कणी रे कान्हा ||१||

न्हात होते न्हानि घरात
तेथेच राहिले पाणी रे कान्हा ||२||

घालीत होते माझी मी वेणी
तेथेच राहिली फणी रे कान्हा ||३||

एका जनार्दनीं राधा गौळण
कृष्ण मनी झाली लिन राधा ||३||

Comments