talve talhat ticket gavlan lyrics
तळवे तळहात तळ टेंकीत । डाव्या गुडघ्यानें रांगत ।
रांगत हा
डाव्या गुडघ्यानें रांगतो ||
रंगणी रंगनाथ । खेळतो हेचि रांगत ये॥१॥
याने माझें कवाड उघडिलें । याने माझे शिंकें तोडिलें ।
दह्यादुधातें भक्षिलें । उलंडिलें ताकातें ||
एक्या हातीं लोण्याचा कवळु । मुख माखिलें अळुमाळु ।
चुंबन देतां येतो परिमळु । नवनीताचा ये सये ||
ऐसा पुराण प्रसिद्ध चोर । केशव नाम्याचा दातार ।
पंढरपुरीं अवतार ||
Comments
Post a Comment
Jara tumhi kahi shanka astiva kiva kahi suchvyche asel tr tumhi comments krun sangu shakta