Posts

Datta datta naam abhang lyrics

Image
 दत्त दत्त नाम नित्य समाधान  अमृत प्राशान नित्यानंद।। दत्त नाम स्मरण भवभय हरण। दत्त गुरु चरण ब्रम्हानंद।। दत्त नाम श्रवण नित्य पारायण। भवसिंधु चरण आत्मानंद||

नावाडी श्रीहरी अभंग lyrics

Image
 नावाडी श्रीहरी,नावाडी तूंचि होई, आता कोण माझी होडी लावील पैलतीरी!!धृ!! डगमग डगमग डोले नाव ही संसारी कृपेने लाव देवा नाव ही किनारी।        !!1!! मनपवनाचे सुटते वादळ मायेमध्ये फिरवतो गोल गोल।             !!2!! सुटती अफाट षड्रिपुच्या लाटा  कैसी लाऊ माझी होडी काठा।             !!3!! जयदास म्हणे नावाडी होऊनी पैलतीरी पोचवी नवोनी।            !!4!!

japta naam vithalache abhang lyrics

Image
  जपता नाम विठ्ठलाचे | भय नाही हो काळाचे || नाममंत्र त्रिअक्षर | करी सदा तो उच्चार || विठ्ठलनामे सुख आनंद | भानुदासा परमानंद ||

sunder ghan nila sawala lyrics in marathi

 सुंदर घन निळा सावळा ऐसे रूप तुझे पाहिले मी डोळा ।।धृ।। मूर्ती ही सावळी चतुर्भुज गळा   नेसलासी कस्तुरी निधळा     ।। शंक चक्र गधा वैजयंती रुळे   तळपती श्रवणी कुंडले       ।। तुका ह्मणे स्वामी विठ्ठल आगळा   मज लागला त्याचा लळा    ।।

आळवा रे भगवंता अभंग alvare bhagwanta abhang lyrics

 आळवा रे भगवंता  सदा चालता बोलता   ।।धृ।। मुखी सदा सत्य बोला त्याचा विषयाचा गलबला ।। मुखी सदा राम कृष्ण बोला  गर्वाने बोला राम कृष्ण हरी बोला ।। तुकड्या दास म्हणे  नेई आम्हा निर्वाणीत  ।।

माझ्या जीवीचे जीवन अभंग Lyrics mazya jiviche jivan abhang lyrics

माझ्या जीवीचे जीवन तो हा विठ्ठल निधान ।।धृ।।  उभा असे विठेवरी वाटी प्रेमाची शिदोरी ।।१।।  आली याची जनी निवरितो चक्रपाणी  ।।२।।  भेट दयेच्या सागरा वीणवितसे कान्होपात्रा ।।३।।

Tujhe Naam Aale Othi lyrics in marathi.

 तुझे नाम आले ओठी सुर भारावले  अतरंगी बाह्यअंगी मन हरपले रे....॥धृ॥ नको झांज चिपळ्या विणा नको भिन्न राग झोपेतही विवेकाला येते आहे जाग रे...॥1॥ आनंदाचा डोह मन आनंद किनारा विकाराच्या शेवाळ्याला नसे तेथ थारा रे....॥2॥ भाव अंतरीचे हळवे जसे जुई फुल स्वःताच्याच सुगंधाची स्वःत लाच भुल रे....॥3॥

Join whatsapp channel

recent posts

Loading recent posts...