नावाडी श्रीहरी,नावाडी तूंचि होई | अभंग lyrics navadu shri hari navadi tuchi hoi
"नावाडी श्रीहरी" हा संत जयदासांचा एक भावपूर्ण अभंग आहे. या अभंगात संसाररूपी समुद्रात भरकटणाऱ्या जीवाच्या होडीसाठी श्रीहरी म्हणजेच भगवानच खरे नावाडी आहेत, हे सांगितले आहे.
जीवाच्या जीवननावेला षड्रिपूंच्या लाटा, मनाच्या वादळे आणि मायेसारख्या भ्रमांमुळे दिशा सापडत नाही. या सर्वातून तारण्यासाठी केवळ ईश्वराची कृपा आणि मार्गदर्शन हवे, हे संत जयदास भावपूर्णतेने सांगतात.
नावाडी श्रीहरी,नावाडी तूंचि होई,
आता कोण माझी होडी लावील पैलतीरी!!धृ!!
डगमग डगमग डोले नाव ही संसारी
कृपेने लाव देवा नाव ही किनारी। !!1!!
मनपवनाचे सुटते वादळ
मायेमध्ये फिरवतो गोल गोल। !!2!!
सुटती अफाट षड्रिपुच्या लाटा
कैसी लाऊ माझी होडी काठा। !!3!!
जयदास म्हणे नावाडी होऊनी
पैलतीरी पोचवी नवोनी। !!4!!
abhang lyrics in english
Navadi Shrihari, navadi tunchi hoi,
Ata kon maazhi hodi lavil pailateeri! ||Dhr||
Dagmag dagmag dole naav hi sansaari,
Krupene laav deva naav hi kinaari. ||1||
Manpavanache sutate vaadal,
Mayemadhye firavto gol gol. ||2||
Sutati afaat shadripuchya laata,
Kaisi laau maazhi hodi kaatha. ||3||
Jaydas mhane navadi houuni,
Pailateeri pochavi navoni. ||4||
Comments
Post a Comment
Jara tumhi kahi shanka astiva kiva kahi suchvyche asel tr tumhi comments krun sangu shakta