Posts

मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics

Image
मन तृप्त झाले आहे तुझा दर्शने मन तृप्त झाले आहे तुझा दर्शने आता नाही देवा काही अन्य मागणे ||धृ|| तूच वाट दिशा तूच, तूच ध्येय अंती गती पावलांची तूच ,तूच चालणे ||१|| थेंब पाण्या ठाई जयसा कण धुळ रूप तसा अंवश बनलो तव मी जगताजिने ||२|| श्वास तैसा ध्यास माझा सुर तैसे गीत रीत जीवनाची झाली तुझा चींतने ||३||

धाव मोरया धाव पाव रे dhav morya dhav pav re lyrics in marathi

Image
धाव मोरया धाव पाव रे दावी  रूप ते साजिरे मोरया...||ध्रु|| जड झाले लोचन एकदा दे दर्शन  गजानना लंबोदरा रे मोरया रून तुझे मोरया सांग कैसे फेडू  काया ही मालिन माझी चरणाशी अंतरू चंदनापरी झिजूनी गंध तुला लावू  भाव भक्तीची अशी फुले तुला वाहू तरी फिटे नाही पांग रे मोरया ||१|| वेड म्हणा भेटाया  नाही कुठले नाते माय बाप बंधू सखा सारे तूच वाटे मोह माय तुझिया पुढे दुःख सारे खोटे वेड मला लागले देवा तुझा दर्शनाचे  विसरलो मी देहभानारे मोरया ||२||

आरती ही तुजला गणराया aarti lyrics

Image
  गणराया आरती ही तुजला ॥ धृ. ॥ रुणझुण पायीं वाजति घुंगूर । गगनी ध्वनी भरला ॥ १ ॥ भाद्रपद मासी शुक्लचतुर्थीसी । पुजिती जन तुजला ॥ २ ॥ गंध पुष्प धुप दीप समर्पुनी । अर्पिती पुष्पांला ॥ ३ ॥ भक्त हरी हा आठवितो रुप । गातो तव लीला ॥ ४ ॥

माझा क्षीण भाग हरपला abhang lyrics

Image
माझा क्षीण भाग हरपला  विठोबा विटेवरी देखिला ||ध्रु|| अवघ्या जन्माचे सार्थक झाले डोळा समचरण देखिले. ||१|| चंद्रभागे तीरी नाचती वारकरी आनंदाने विठ्ठलाच्या नाम गजरी. ||२|| तो सुख सोहळा देवांसी दुर्लभ आम्हासी सुलभ चोखा म्हणे ||३||

गोकुळात रंग खेळतो रंग खेळतो श्री हरी marathi lyrics ajay atul jayesh kale

Image
 गोकुळात रंग खेळतो रंग खेळतो श्री हरी मोहनात दंग राधि का  दंग राधिका भाबडी लावितो लळा शाम सावळा लागला तुझा रंग हा निळा सूर बासरीचा मोहवी मनाला बासरीत या जीव गुंतला सोडवू कसा रे सांग मोहना  जीव प्राण होऊन कान्हा शाम रंग लावून कान्हा सोडून गोकुळ कान्हा जाऊ नको

कृष्ण सावळा हरी सावळा देव सावळा गौळण lyrics in marathi

Image
 गौळण कृष्ण सावळा हरी सावळा देव सावळा बाई बाई बाई बाई ग बाई ग नंदाचा बाळ हा होता ||ध्रु|| घागर घेऊनी पानियाशी जाता अडवितो अमुचा वाटा ग बाई बाई  ||१|| ऐका जनार्दनी पूर्ण कृपेने अपराध माझा नाही ग बाई बाई||२||

होय होय वारकरी अभंग lyrics

  अभंग  होय होय वारकरी होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ॥१॥ काय करावीं साधनें । फळ अवघेचि येणें ॥ध्रु.॥ अभिमान नुरे । कोड अवघेचि पुरे ॥२॥ तुका म्हणे डोळां । विठो बैसला सांवळा ॥३॥

Join whatsapp channel

recent posts

Loading recent posts...