Posts

भवसागर हा पार कराया नाम मुखी ते घ्यावे अभंग Lyrics

Image
बुवा श्री दिप्तेश मेस्त्री रिचत  अभंग भवसागर हा पार कराया नाम मुखी जे घ्यावे हरी नाम मुखी जे घ्यावे  भजनी तव लागावे ||ध्रु|| नाम संकीर्तन साधन हे सोपे जळतील पापे जन्मानतरीचे नारायण जय नारायण जय नारायण श्री हरी ||१|| हरी भजनासी ध्यान धरावे ब्रम्हानंदी तल्लीन व्हावे ||२||                        

रिक्त झाला दरबार लंगार lyrics मयूर गवळी

Image
  रिक्त झाला दरबार लंगार लोकराज कै. सुधीर कलिंगन रिक्त झाला दरबार म्यान झाली तलवार लोकराज परतुनी ये रे पुन्हा एक वार || दशावतार जन्म वाहिला ऐसा राजा भूतः न झाला रिक्त झाला दरबार ।।

धन्य धन्य ते नगर अभंग lyrics

Image
  धन्य धन्य ते नगर  Abhang lyris धन्य धन्य ते नगर   वैकुंठ पंढरपूर ।।धृ।। धन्य धन्य ती चंद्र भागा मध्ये पुंडलिक उभा ।।१।। धन्य धन्य ते वाळवणंट क्रिडा करितो गोविंद ।।२।। धन्य धन्य पंढरीचा वास जेव्हा गाई भानुदास ।।३।। dhanya dhanya te nagar nagar  vaikunth pandhrpur ||  dhanya dhanya ti chandra bhaga  madhe pundalika ubha ||  dhanya dhanya te valvanta  krida krito govind ||  dhanya dhanya pandharicha  vasa  jevha gai bhanudas ||

नाम तुझे, नारायणा अभंग lyrics nam tuze re narayana lyrics

नाम तुझे, नारायणा अभंग नाम तुझे, नारायणा फोडी   पाषाणाला पान्हा  ।। धृ ।। अज्या मेळा पापरासी, तोही गेला वैकुंठाशी।। १ ।। नाम जपले वल्मिकिने, फुटली त्याला दोनी पाने ।। २ ।। ऎसा नामाचा महिमा, तुका म्हणे झाली सीमा ।। ३ ।।

काय सांगों देवा ज्ञानोबाची ख्याती अभंग Lyrics in marathi

 काय सांगों देवा ज्ञानोबाची ख्याती  अभंग काय सांगों देवा ज्ञानोबाची ख्याती ।  वेद म्हैशामुखीं बोलविलें ॥१॥  कोठवरी वानूं याची स्वरूपस्थिती ।  चालविली भिंती मृत्तिकेची ॥२॥  अविद्या मायेचा लागों नेदी वारा ।  ऐसें जगदोद्धारें बोलविलें ॥३॥  नामा ह्मणे यांनीं तारिले पतित ।  भक्ति केली ख्यात ज्ञानदेवें ॥४॥

मंगलारंभी तुझी प्रार्थना अभंग lyrics

Image
  मंगलारंभी तुझी प्रार्थना मंगलारंभी तुझी प्रार्थना वनदीतो मी तव चरणा प्रसन्न व्हा गजवदना ।।धृ।। विघ्ने पळती तुझिया स्मरणा तुजविण शरण मी जाऊ कोना हे गजवदना या तुम्ही स्मरणा आनंद अमुचा मन ।।१।। भक्ती भावे पूजन चाले हर्ष भराने हे मन डोले प्रसन्न होऊन दर्शन द्यावे ही आमुची प्रार्थना ।।२।। हे गजवदना आलो चरणा देवा आलो चरणा आशीर्वाद हो द्या तुम्ही सकळा कृपा तुझी मोरया ।।३।।

रूप सावळे सुंदर रूपक Lyrics in marathi

रूप सावळे सुंदर रूप सावळे सुंदर  कानी कुंडले मकरा-कार || धृ || तो हा पंढरीचा राणा नकळे योगियांच्या ध्याना || १ || पितांबर वैजयंती माथा मुकुट शोभे दिप्ती || २ || एका जनार्दनी ध्यान विठे पाऊले समान || ३ ||

Join whatsapp channel

recent posts

Loading recent posts...