देखोनिया तुझ्या रूपाचा आकार
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार उभा कटी कर ठेवुनिया || तेणें माझ्या चित्ता होय समाधान वाटतें चरण न सोडावे || मुखे गातो गीत वाजवतो टाळी नाचतो राऊळी प्रेमसुखें || तुका म्हणे मज तुझ्या नामापुढे तुच्छ हे बापुडे सकळही ||