Posts

Showing posts matching the search for विठ्ठल

विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी अभंग lyrics

  विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी अभंग  संत तुकाराम विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा ।। विठ्ठल अवघा भांडवला विठ्ठल बोला विठ्ठल बोला ।। विठ्ठल नाद विठ्ठल भेद विठ्ठल छंद विठ्ठल ।। विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा तुक्या विठ्ठल विठ्ठल मुखा ।।

पंढरीचा राणा विठ्ठल धनी

पंढरीचा राणा विठ्ठल धनी पंढरीचा राणा विठ्ठल धनी राणी रुक्मिणी सत्यभामा राणी रुक्मिणी पंढरीचा राणा विठ्ठल धनी || भूमिमध्ये गुप्त कान्होपात्रा झाली उजवे बाजू केली लक्ष्मीची पुढे हो प्रतिमा नामदेव पायरी उभा महाद्वारी चोखामेळा राणी रुक्मिणी सत्यभामा राणी रुक्मिणी पंढरीचा राणा विठ्ठल धनी || पुढे मल्लिकाअर्जुन महिमा असे फार लिंग असे थोर महादेवाचे राणी रुक्मिणी सत्यभामा राणीरुक्मिणी पंढरीचा राणा विठ्ठल धनी || पुढे भागीरथी मध्ये पुंडलिक आणिक तेथे वेणू नाद देवाचे समोर नरहरी सोनार हृदयी निरंतर नाव घेतो राणी रुक्मिणी सत्यभामा राणीरुक्मिणी पंढरीचा राणा विठ्ठल धनी ||

gajar kirtanacha song lyrics lyrics in marathi

Image
gajar kirtanacha song lyrics in marathi  छोटा परिचय : gajar kirtanacha sohala anandacha lyrics या अभंगात एका वारकऱ्याची विठ्ठलावरील गाढ श्रद्धा व्यक्त होते. कीर्तनातून त्याला आत्मिक शांती आणि जीवनाचा खरा अर्थ गवसला. हरी नामाच्या गजरात तो स्वतःला शोधतो आणि त्याचे शरीरच पंढरी व विठ्ठल त्याच्या हृदयात वास करतो. श्वास जपमाळ आणि मन तालवाद्यांच्या रूपात विठ्ठलात तल्लीन होतात. जीव आणि शिव यांचा अभंग मेळ कीर्तनातून साधला जातो, असा भावपूर्ण अनुभव या अभंगात आहे. तुझ्या किर्तनात न्हालो आणि माणसात आलो,  हरी नामाचा गजर केला मला मी घावलो । जन्म झाला वारकरी वाट समजली खरी,  देह देवाची पंढरी. विठू मनाच्या गाभारी,  श्वास झालं जपमाळ, मन चिपळ्यानी टाळ।  मेळ जीवाचा शिवाचा झाला अभंग जिन्याचा,  गजर कीर्तनाचा गजर कीर्तनाचा More Marathi abhang You May Like गोड तुझे नाम गोड तुझे रूप मौन का धरिलें सांगा पांडुरंगा विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी gajar kirtanacha song lyrics in marathi   WhatsApp वर शेअर करा Facebook वर शेअर करा

pandhari ye nagari janu vaikunth bhuvari | पंढरी ये नगरी lyrics

Image
pandhari ye nagari janu vaikunth bhuvari | पंढरी ये नगरी lyrics छोटा परिचय  पंढरपूर, महाराष्ट्रातील एक अद्वितीय आणि पवित्र शहर, जे थेट वैकुंठलोकाप्रमाणे पृथ्वीवर अवतरले आहे. भगवान विठ्ठलाची ही नगरी चंद्रभागा नदीच्या रमणीय वेढ्यात वसलेली आहे. येथे सतत टाळ आणि मृदुंगाच्या सुमधुर ध्वनीने वातावरण भारलेले असते. याच पवित्र स्थळी संत तुकाराम महाराजांना प्रत्यक्ष विठ्ठलाचे दर्शन झाले, अशी श्रद्धा आहे. पंढरपूर केवळ एक भौगोलिक स्थान नसून, ते लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचे केंद्र आहे, जिथे भक्ती आणि अध्यात्माचा अनुभव मिळतो. #पंढरपूर #विठ्ठल #वैकुंठ #महाराष्ट्र #भक्ती #वारकरी #चंद्रभागा #तुकाराम #आध्यात्म पंढरी ये नगरी जणू वैकुंठ भूवरी विठुरायाची नगरी ।। भोवती भिवरेचा वेढा  मधे पंढरीचा हुडा ।। गस्त फिरे चहुकोनी  टाळ मृदुंगाचा ध्वनी ।। ऐसे स्थळ नाही कोठे  तुकयाला विठ्ठल भेटे ।। पंढरपूर: विठ्ठलाची वैकुंठभूमी, चंद्रभागेच्या कुशीत. टाळ-मृदुंगाचा नाद आणि तुकारामांना भेटलेल्या विठ्ठलाची पावन भूमी. भक्ती आणि अध्यात्माचे केंद्र. #पंढरपूर #विठ्ठल #महाराष्ट्र #भक्ती #मराठी  pandhari ye...

sunder ghan nila sawala lyrics in marathi

 सुंदर घन निळा सावळा ऐसे रूप तुझे पाहिले मी डोळा ।।धृ।। मूर्ती ही सावळी चतुर्भुज गळा   नेसलासी कस्तुरी निधळा     ।। शंक चक्र गधा वैजयंती रुळे   तळपती श्रवणी कुंडले       ।। तुका ह्मणे स्वामी विठ्ठल आगळा   मज लागला त्याचा लळा    ।।

भस्म उटी रुंडमाळा lyrics बुवा विठ्ठल गावकर

 भस्म उटी रुंडमाळा     भस्म उटी रुंडमाळा । हातीं त्रिशुळ नेत्रीं ज्वाळा ॥ १ ॥  गज चर्म व्याघ्रांबर । कंठीं शोभे वासुकी हार ॥ २ ॥   भूतें वेताळ नाचती । हर्षयुक्त उमापती ॥ ३ ॥   सर्व सुखाचें आगर । म्हणे नरहरी सोनार ॥ ४ ॥

माझ्या जीवीचे जीवन अभंग Lyrics mazya jiviche jivan abhang lyrics

माझ्या जीवीचे जीवन तो हा विठ्ठल निधान ।।धृ।।  उभा असे विठेवरी वाटी प्रेमाची शिदोरी ।।१।।  आली याची जनी निवरितो चक्रपाणी  ।।२।।  भेट दयेच्या सागरा वीणवितसे कान्होपात्रा ।।३।।

कणा कणा वर लिहिले प्रभु तू lyrics बुवा विठ्ठल गावकर

कणा कणा वर लिहिले प्रभु तू  कणा कणा वर लिहिले प्रभु तू  खानाऱ्याचे नाव भगवान कोठे माझे नाव ||ध्रु|| थंडी वारा पाऊस विसरुनी शोधायाला माझा रे क्षण  शिरी तापल्या उन्हात रण रण फिरतो गावो गाव ||१|| आसुसलेला जीव उपाशी समोर बघतो रचल्या राशी घास येईना परी वोठाशी दाव मला तू डाव ||२|| कुणी देईना अन्नाचा कण व्यकुळतेरे तळमळते मन फिरावयाचे असेच वण वण कीती मी गवो गाव ||३||

Naam gheta utha uthi abhang lyrics in marathi

Image
 नाम घेता उठाउठी, होय संसाराची तुटी || धृ || ऐसा लाभ बांधा गांठी विठ्ठल पायी मिठी || १ || नामापरते साधन नाही जें तू करिसी आणिक कांही || २ || हाकरोनी सांगे तुका नाम घेता राहो नका || ३ ||

Join whatsapp channel

recent posts

Loading recent posts...