सुखकर्ता दुखहर्ता आरती | Sukhkarta Dukhharta Aarti Lyrics
सुखकर्ता दुखहर्ता आरती मराठीमध्ये वाचा. श्री गणपतीची प्रसिद्ध आरती, संपूर्ण lyrics आणि Roman Marathi lyrics येथे दिले आहेत.
सुखकर्ता दुखहर्ता आरती | Sukhkarta Dukhharta Aarti
सुखकर्ता दुखहर्ता ही श्री गणपतीची अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय आरती आहे. गणपतीची पूजा आणि आरती करताना ही आरती भक्तिभावाने म्हटली जाते. खाली सुखकर्ता दुखहर्ता आरतीचे संपूर्ण मराठी lyrics दिले आहेत.
सुखकर्ता दुखहर्ता आरती
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
श्री मंगल मूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ।
जय देव जय देव ॥
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरे जडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
श्री मंगल मूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ।
जय देव जय देव ॥
लंबोदर पितांबर फनी वरवंदना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
श्री मंगल मूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ।
जय देव जय देव ॥
Sukhkarta Dukhharta Aarti in English / Roman Marathi Lyrics
Sukhkarta Dukhharta Varta Vighnachi
Nuravi Purvi Prem Krupa Jayachi ।
Sarvangi Sundar Uti Shendurachi ।
Kanthi Zhalake Maal Muktaphalachi ॥
Jai Dev Jai Dev Jai Mangalmurti ।
Shree Mangal Murti ।
Darshanmatre Mankamna Purti ।
Jai Dev Jai Dev ॥
Ratnakhachit Fara Tuj Gaurikumara ।
Chandanachi Uti Kunkumakeshara ।
Hire Jadit Mukut Shobhato Bara ।
Runzhunti Nupure Charani Ghagariya ॥
Jai Dev Jai Dev Jai Mangalmurti ।
Shree Mangal Murti ।
Darshanmatre Mankamna Purti ।
Jai Dev Jai Dev ॥
Lambodar Pitambar Phani Varvandana ।
Saral Sond Vakratund Trinayana ।
Das Ramacha Vaat Pahe Sadana ।
Sankati Pavave Nirvani Rakshave Survandana ॥
Jai Dev Jai Dev Jai Mangalmurti ।
Shree Mangal Murti ।
Darshanmatre Mankamna Purti ।
Jai Dev Jai Dev ॥
सुखकर्ता दुखहर्ता आरती कोणाची आहे?
सुखकर्ता दुःखहर्ता ही श्री गणपतीची प्रसिद्ध आरती आहे. ही आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचल्याचे प्रचलित मानले जाते. गणपतीची आरती करताना महाराष्ट्रात ही आरती मोठ्या भक्तिभावाने म्हटली जाते.
सुखकर्ता दुखहर्ता आरती कधी म्हणतात?
ही आरती गणपतीची पूजा, गणेश चतुर्थी, गणेशोत्सव तसेच दैनंदिन गणपती आरतीच्या वेळी म्हटली जाते.
घालीन लोटांगण | Ghalin Lotangan Lyrics in Marathi
संपुर्ण गणपती बाप्पा आरती येथे वाचा

Comments
Post a Comment
Jara tumhi kahi shanka astiva kiva kahi suchvyche asel tr tumhi comments krun sangu shakta