लवथवती विक्राळा आरती | Lavthavti Vikrala Aarti Lyrics

 लवथवती विक्राळा ब्रह्माण्डी माळा ही भगवान श्री शंकराची अत्यंत प्रसिद्ध मराठी आरती आहे. या आरतीला “जय देव जय देव जय श्रीशंकरा” या ओळीने सुरुवात होते. महादेवाची पूजा, सोमवार, महाशिवरात्री तसेच इतर धार्मिक प्रसंगी ही आरती श्रद्धेने म्हटली जाते.

या पोस्टमध्ये तुम्हाला लवथवती विक्राळा आरतीचे संपूर्ण मराठी lyrics वाचता येतील.

🕉️ लवथवती विक्राळा आरती

लवथवती विक्राळा ब्रह्माण्डी माळा ।

वीषे कण्ठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ।

लावण्य सुन्दर मस्तकी बाळा ।

तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।

आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ॥ १ ॥


कर्पुर्गौरा भोळा नयनी विशाळा ।

अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।

विभुतीचे उधळण शितिकण्ठ नीळा ।

ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।

आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ॥ २ ॥


देवी दैत्यी सागरमन्थन पै केलें ।

त्यामाजी अवचित हळाहळ जें उठिले ।

ते त्वां असुरपणे प्राशन केलें ।

नीलकण्ठ नाम प्रसिद्ध झालें ॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।

आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ॥ ३ ॥


व्याघ्राम्बर फणिवरधर सुन्दर मदनारी ।

पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी ।

शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।

रघुकुळटिळक रामदासा अन्तरी ॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।

आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ॥ ४ ॥


Lavthavti Vikrala Aarti

Lavthavti Vikrala Brahmandi Mala ।
Vishe Kanth Kala Trinetri Jwala ।
Lavanya Sundar Mastaki Bala ।
Tethuniya Jal Nirmal Vahe Zulzula ॥

Jai Dev Jai Dev Jai Shree Shankara ।
Aarti Ovalu Tuj Karpurgaura ॥ 1 ॥

Karpurgaura Bhola Nayani Vishala ।
Ardhhangi Parvati Sumananchya Mala ।
Vibhutiche Udhhalan Shitikanth Nila ।
Aisa Shankar Shobhe Umavelhala ॥

Jai Dev Jai Dev Jai Shree Shankara ।
Aarti Ovalu Tuj Karpurgaura ॥ 2 ॥

Devi Daityi Sagarmanthan Pai Kele ।
Tyamaji Avachit Halahal Je Uthile ।
Te Tva Asurpane Prashan Kele ।
Nilkanth Naam Prasiddha Jhale ॥

Jai Dev Jai Dev Jai Shree Shankara ।
Aarti Ovalu Tuj Karpurgaura ॥ 3 ॥

Vyaghrambar Phanivardhar Sundar Madanari ।
Panchanan Manmohan Munijan Sukhakari ।
Shatakotiche Beej Vache Uchchari ।
Raghukul Tilak Ramdasa Antari ॥

Jai Dev Jai Dev Jai Shree Shankara ।
Aarti Ovalu Tuj Karpurgaura ॥ 4 ॥


🙏 लवथवती विक्राळा आरती कोणाची आहे?

लवथवती विक्राळा आरती ही भगवान श्री शंकर अर्थात महादेवाची आरती आहे. या आरतीमध्ये भगवान शंकराचे स्वरूप, त्यांचे नीलकंठ रूप, जटांमधून वाहणारी गंगा आणि माता पार्वती यांचे वर्णन केले आहे.

🔱 लवथवती विक्राळा आरती कधी म्हणावी?

ही आरती विशेषतः:

सोमवारच्या दिवशी

महाशिवरात्रीला

महादेवाच्या पूजेनंतर

श्रावण महिन्यात

शिव मंदिरातील आरतीच्या वेळी

म्हटली जाते.


लवथवती विक्राळा आरती - श्री शंकराची आरती


Comments