jya sukha karane lyrics in Marathi ज्या सुखा कारणे देव वेडावला

"ज्या सुखा कारणे देव वेडावला" हा अभंग संतांच्या महात्म्याचे आणि त्यांच्या चरणातील सुखाचे गौरवगान करतो.
या अभंगात सांगितले आहे की, भगवंताने वैकुंठ सोडून संतांच्या घरात राहणे पसंत केले, कारण त्याला तिथेच खरे आध्यात्मिक सुख लाभते.
संतांच्या चरणी भौतिक व आध्यात्मिक सुखांची प्राप्ती होते. म्हणूनच देव देखील त्यांच्या सेवेत भुलतो, असे संत जनार्दन म्हणतात.

 

ज्या सुखा कारणे देव वेडावला,

वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला || धृ ||

धन्य धन्य संताचे सदन
तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण //1//

सर्व सुखाची सुखराशी, 
 संत चरणी भुक्ती मुक्ती दासी //2//

एका जनार्दनी पार नाही सुखा
म्हणोनी देव भुलले देखा देखा //3//

Abhang lyrics in Marathi 

Jya sukha karane Dev vedavala,  
Vaikunth soduni sant sadani rahila. ||Dhr||

Dhanya dhanya santache sadan,  
Tethe Lakshmi sahit shobhe Narayan. ||1||

Sarva sukhachi sukharaashi,  
Sant charani bhukti mukti daasi. ||2||

Eka Janardani paar nahi sukha,  
Mhanoni Dev bhullale dekha dekha. ||3|| 

Comments

Popular posts from this blog

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान lyrics in marathi

गोड तुझे रूप गोड तुझे नाम lyrics in marathi | god tujhe roop god tujhe naam lyrics

man trupt zale ahe tuzya | मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics in Marathi