शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान ll गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा पायात नुपूर छान, आवडते बेलाचे पान ll जटेतुन वाहे झुळ झुळ गंगा डोक्यावर चांदोबा छान, आवडते बेलाचे पान ll महादेवाच्या हातात डमरू त्रिशूल पायात खडावा छान , आवडते बेलाचे पान ll बेलपुष्पांवरी शंकराची प्रीती कपाळाला भस्म शोभे छान, आवडते बेलाचे पान ll घेऊन रूप भिल्लींण आली कैलासी नाचत छान , आवडते बेलाचे पान ll डोळे उघडुन शंकर पही पार्वती दिसतीया छान , आवडते बेलाचे पान || शंकराच्या मांडीवरती गिरिजा गणपती शोभून दिसतोय छान,आवडते बेलाचे पान || WhatsApp वर शेअर करा Facebook वर शेअर करा
देई मज प्रेम सर्वकाळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम || सादा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाई चा पती सोयरिया || विठू माऊली हाचि वर देई संचारुनी येई हृदयी माझ्या || तुका म्हणे काही न मागे आणिक तुझे पायी सुख सर्व आहे
गौळण काय करावे काय करावे हरीला काय करावे काय करावे हरीला शालू रंगाने भिजला ||ध्रु|| आजच मी हो नवा कढीला किती हवसेने नेसायला आजवरी मी याला किती जपूनी ठेविला ||१|| सासू विचारील मजला का गेलीस रास क्रिडेला काय सांगू मी तुजला जीव मुरलिने वेडावला ||२|| येसा किती छळीसी तो भक्ताला नाम या आत्मा चरणी रंगला ||३||
मन तृप्त झाले आहे तुझा दर्शने मन तृप्त झाले आहे तुझा दर्शने आता नाही देवा काही अन्य मागणे ||धृ|| तूच वाट दिशा तूच, तूच ध्येय अंती गती पावलांची तूच ,तूच चालणे ||१|| थेंब पाण्या ठाई जयसा कण धुळ रूप तसा अंवश बनलो तव मी जगताजिने ||२|| श्वास तैसा ध्यास माझा सुर तैसे गीत रीत जीवनाची झाली तुझा चींतने ||३||
तुझे नाम आले ओठी सुर भारावले अतरंगी बाह्यअंगी मन हरपले रे....॥धृ॥ नको झांज चिपळ्या विणा नको भिन्न राग झोपेतही विवेकाला येते आहे जाग रे...॥1॥ आनंदाचा डोह मन आनंद किनारा विकाराच्या शेवाळ्याला नसे तेथ थारा रे....॥2॥ भाव अंतरीचे हळवे जसे जुई फुल स्वःताच्याच सुगंधाची स्वःत लाच भुल रे....॥3॥
सुंदरते ध्यान बैसे सिंहसिनी वामनगी नंदनी जनकाची || दक्षिनेसी उभा बंधू लक्षुमान भरत शत्रुघ्न व कैकयी सुत || सन्मुख तो उभा मारुती बलभीम जपे राम नाम सर्व काळ || तुका म्हणे माझा श्रीरामाचे ध्यान जीव लिंबे लोन उतरुण ||
🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
ReplyDelete