चला पंढरपूराला जाऊया chala pandharala jauya lyrics in marathi

 "चला पंढरपूराला जाऊया" हे भक्तिरसाने भरलेले वारकरी संप्रदायाचे गीत आहे. या गीतात आषाढी एकादशीच्या वेळचे वारीचे वातावरण, भक्तांची आस्था आणि पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ सुंदरपणे व्यक्त केली आहे. पांडुरंगाच्या चरणी भक्तिभावाने गायले जाणारे हे गीत पंढरपूरच्या वारीसाठी अत्यंत लोकप्रिय आहे.




चला पंढरपूराला जाऊया
पांडुरंगाचे दर्शन घेऊया ।।धृ।।

आषाढिला कार्तिकीला
भाविक होतील गोळा
चंद्रभागेच्या काठावरती
वारकळ्यांचा मेळा
त्यांच्या संगती पंचपदी गाऊया ।।१।।

गळ्यात घालुनी तुळशी माळ
खांद्यावरती फेटा
मुक्तामाळा झाडाखाली
कणी भाकरी कोंडा
सारे मुखाने एक मुखे खाऊया ।।२।।

वीणा चिपळी टाळा संगे
मृदंग होई दंग
कमरेवरती हात ठेवूनि
नाचे पांडुरंग
डोळे भरून एकमुखे पाहूया ।।३।।


Lyrics in english 


Chala Pandharpurala jauya

Pandurangache darshan gheuya ||Dhru.||


Ashadhila Kartikila

Bhavik hotil gola

Chandrabhagechya kathavarti

Varkalyancha mela

Tyanchya sangati Panchpadi gauya ||1||


Galyat ghaluni tulashi maal

Khandyavarti pheta

Muktamala jhadakhaali

Kani bhakari konda

Sare mukhane ek mukhe khauya ||2||


Veena chipli taala sange

Mridang hoee dang

Kameravarti haat thevuni

Nache Pandurang

Dole bharun ekmukhe pahuya ||3||


Comments

Popular posts from this blog

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान lyrics in marathi

गोड तुझे रूप गोड तुझे नाम lyrics in marathi | god tujhe roop god tujhe naam lyrics

man trupt zale ahe tuzya | मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics in Marathi