वाजे मृदुंग टाळ वीणा lyrics in marathi

वाजे मृदुंग टाळ वीणा ये रे नाचत गौरी गणा|| गणपती बाप्पा मोरया - मंगलमूर्ती मोरया नाच नाच रे गजानना पायी बांधून घुंगुरवाळा येई ठुमकत तू लडीवाळा जना आवडे तव हा चाळा देई आनंद गौरी बाळा दुडूदुडू ये रे लुटूलुटू ये रे शिवसुता वेल्हाळा|| नाच नाच रे गजानना | वाजे मृदुंग टाळ वीणा ||1|| गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया तुझ्या चिंतनी जमले सारे खाली आले नभातील तारे नाचे चैतन्ये अवघे वारे पाना-फुलात भरलासी तू रे कर्पूरगौरा, जगदोधारा, ये धरणी बल्लाळा || नाच नाच रे गजानना | वाजे मृदुंग टाळ वीणा ||2|| गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया तू देवांचा देव खरा आदिनाथ तू मंगलकारा देई कृपेच्या अमृतधारा तारी विश्वाचा सर्व पसारा हे विघ्नेशा, हे जगदीशा, हे धरणी नी परमेशा || नाच नाच रे गजानना | वाजे मृदुंग टाळ वीणा ||3|| गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया