वाजे मृदुंग टाळ वीणा lyrics in marathi



वाजे मृदुंग टाळ वीणा
ये रे नाचत गौरी गणा||
गणपती बाप्पा मोरया - मंगलमूर्ती मोरया
नाच नाच रे गजानना

पायी बांधून घुंगुरवाळा
येई ठुमकत तू लडीवाळा
जना आवडे तव हा चाळा
देई आनंद गौरी बाळा
दुडूदुडू ये रे लुटूलुटू ये रे
शिवसुता वेल्हाळा||

नाच नाच रे गजानना  | वाजे मृदुंग टाळ वीणा ||1||
गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया

तुझ्या चिंतनी जमले सारे
खाली आले नभातील तारे
नाचे चैतन्ये अवघे वारे
पाना-फुलात भरलासी तू रे
कर्पूरगौरा, जगदोधारा,
ये धरणी बल्लाळा ||

नाच नाच रे गजानना  | वाजे मृदुंग टाळ वीणा ||2||
गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया

तू देवांचा देव खरा
आदिनाथ तू मंगलकारा
देई कृपेच्या अमृतधारा
तारी विश्वाचा सर्व पसारा
हे विघ्नेशा, हे जगदीशा,
हे धरणी नी परमेशा ||

नाच नाच रे गजानना | वाजे मृदुंग टाळ वीणा ||3||
गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया

Comments

Post a Comment

Jara tumhi kahi shanka astiva kiva kahi suchvyche asel tr tumhi comments krun sangu shakta

Join whatsapp channel

recent posts

Loading recent posts...

popular posts

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान lyrics in marathi

गोड तुझे रूप गोड तुझे नाम

maun ka dharile tumhi sanga panduranga abhang lyrics

काय करावे काय करावे हरीला शालू रंगाने भिजला गौळण Lyrics बुवा दिप्तेष मेस्त्री

मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics

Tujhe Naam Aale Othi lyrics in marathi.

सुंदरते ध्यान बैसे सिंहसिनी अभंग lyrics