Posts

रखुमा माझी पेरणी करी

Image
रखुमा माझी पेरणी करी माझा पांडूरंग नांगर धरी माझी शेती ही पंढरी ||धृ.|| अठरा धान्य मीच पिकवितो चोर लूटारूंचे घर मी भरतो निसर्गाशी सदा झगडतो चिंता माझ्या उरी माझी शेती ही पंढरी ||1|| मजूर माझा भाऊ धाकटा कधी होणार नीटनेटका....(2) कष्ट करूनी सदा भाकितो संसाराच्या घरी माझी शेती ही पंढरी ||2|| धान्य पेरीले बहू मोलाचे पंचतत्त्वे तया रक्षिले तुका म्हणे जाऊ पाहाया वैकूंठीचा हरी रखुमा माझी पेरणी करी ||3||

samadhi sadhan sanjeevan naam bhimsen joshi

Image
समाधि साधन संजीवन नाम । शांति दया सम सर्वांभूतीं ॥१॥ शांतीची पैं शांति निवृत्ति दातारू । हरिनाम उच्चारू दिधला तेणें ॥२॥ शम-दम-कळा, विज्ञान-सज्ञान । परतोनि अज्ञान न ये घरा ॥३॥ ज्ञानदेवा सिद्धी-साधन अवीट । भक्ति-मार्ग नीट हरिपंथीं ॥४॥

अभंगाची गोडी करी ज्यास वेडी lyric in marathi

Image
अभंग अभंगाची गोडी करी ज्यास वेडी तोचि पुण्य जोडी पंढरीचे || टाळ मृदंग विना साथ ज्याची भक्ती भाव गोडी विठ्ठलाची || बघा संत मेळा सदा गुंगलेला सदा गुंतलेला हरी भजनात || गाभाऱ्यात कोण विठू जाणे चोखोबा तृष्टी वाट पाहे || 

मोरया मोरया गोड हे नाम तुझे , प्रार्थना

Image
मोरया मोरया गोड हे नाम तुझे | कृपा सागरा हेची माहेर माझे || तुझी सोंड बा वाकुडी एकदंता | मला बुद्धी दे मोरया गुणवंता ||

यमुनेच्या तिरावरी कान्हा वाजवतो बासरी, गौळण Lyrics

यमुनेच्या तिरावरी कान्हा वाजवतो बासरी लाडिगोडी लावू नको खोडी माझी काडू नको झाले मी बावरी कान्हया जाऊ देरे माघारी || सावळे तुझे रूप मनोहर वेड लावीते मनी कानी कुंडल नयनी काजळ पितांबर जरतारी एक एक जमल्या साऱ्या गौळणीराचाती फेर धरुनी || एका जनार्दनी श्रीहरी भजनी सदगुरू चरणाधरी म्हणे मुकुंदा तुला विनविते करू नको शिरजोरी जाऊ दे रे अमुच्या सदनी सोड वाट झडकरी ||

जयाचे पाहता श्री मुख , अभंग Lyrics

जयाचे पाहता श्री मुख हरे हो तेचि कोटी जन्म दुःख || तोहा उभा विटेवारी भक्त दास म्हणता कैवारी || वेदासी तो दुर्गम आम्हा नकळे त्याचे वर्म || ऐसा भक्त वत्सल दीना नाथ ऐका जनार्दनीचे ध्यान || 

शिणले तन मन वाट पाहुनी भैरवी अजित कडकडे

Image
शिणले तन मन वाट पाहुनी येशील कधी सदनी मोरया शरण तुझ्या चरणी || विघ्न हारिसी सकल जागचे मंगल होते भक्त गणांचे या वाचनाला जाग गणेश तुझ वीण नाही कोणि || दास तुझा मी शत जन्मीचा तु प्रतिपालक या श्वासांचा आज परंतु नाही दर्शन आले मन भरुनी || अजाण आम्ही जाणुन घे रे अप्रधाला पोटी घे रे साद ऐकुनी धावत ये रे हीच आस मनी ||

Join whatsapp channel

recent posts

Loading recent posts...