संत एकनाथ एका जनार्दनी

 SANT EKNATH EKA JANRDHANI ABHANG GAVLAN 


शिव नाम रे , शिव नाम रे , शिव नाम रे उच्चारा
तेणे कळी काळासी दरारा ||
ऐसा नामाचा महिमा 
नकळेची आगमा निगमा||
सकाळ मंत्रांचे माहेरी 
शिवनाम पंचा अक्षर ||
एका जनार्दनी वाचे
शिव नाम जपा साचे ||


भूमी भार व्हाया
का रे जन्मली ही काया ||
न घडे वाचे नाम स्मरण 
जिव्हा नव्हे चर्म जाण ||
न घडे करे दान धर्म 
कर नोहे ते सर्प जाण ||
पायी तीर्थयात्रा न घडे
पाय नोहे ती लाकडे ||
एका जनार्दनी ते वेडे... 
नरदेही प्रत्यक्ष रेडे ||


जयाचे पाहता श्री मुख 
हरे हो तेचि कोटी जन्म दुःख ||
तोहा उभा विटेवारी 
भक्त दास म्हणता कैवारी ||
वेदासी तो दुर्गम
आम्हा नकळे त्याचे वर्म ||
ऐसा भक्त वत्सल दीना नाथ 
ऐका जनार्दनीचे ध्यान || 


यमुनेच्या तिरावरी कान्हा वाजवतो बासरी
लाडिगोडी लावू नको खोडी माझी काडू नको
झाले मी बावरी कान्हया जाऊ देरे माघारी ||
सावळे तुझे रूप मनोहर वेड लावीते मनी
कानी कुंडल नयनी काजळ पितांबर जरतारी 
एक एक जमल्या साऱ्या गौळणीराचाती फेर धरुनी ||
एका जनार्दनी श्रीहरी भजनी सदगुरू चरणाधरी
म्हणे मुकुंदा तुला विनविते करू नको शिरजोरी
जाऊ दे रे अमुच्या सदनी सोड वाट झडकरी ||


गोकुळाला बाई गोकुळाला 
लावी वेड तुझा कान्हा ||
नवनीत चोळी करी मस्करी
रंग भोरोनी मारी पिचकारी
चालताना तुझा श्रीहरी 
घालितो धिंगाणा ||
जमवुनी साऱ्या गोकुळच्या पोरी
नदी किनारी खेळे बा हरी
चालताना तुझा श्रीहरी 
घालितो धिंगाणा ||
एका जनार्दनी यशोदेचा कान्हा
कुठं वर सोसु मी याचा धिंगाणा
चालताना तुझा श्रीहरी 
घालितो धिंगाणा ||

जयाचे पाहता श्री मुख
हरे हो तेचि कोटी जन्म दुःख ||

तोहा उभा विटेवारी
भक्त दास म्हणता कैवारी ||

वेदासी तो दुर्गम
आम्हा नकळे त्याचे वर्म ||

ऐसा भक्त वत्सल दीना नाथ
ऐका जनार्दनीचे ध्यान ||


धन्य धन्य जन्म ज्याचा

वारकरी पंढरीचा ।।१।।

जाय नेमें पंढरीसी ।
चुकों नेदी तो वारीसी ।।२।।

आषाढी कार्तिकी ।
सदा नाम गाय मुखीं ।।३।।

एकाजर्नाधनी करी वारी ।
धन्य तोचि बा संसारी ।।४।।



Comments

recent posts

Loading recent posts...

popular posts

गोड तुझे रूप गोड तुझे नाम lyrics in marathi | god tujhe roop god tujhe naam lyrics

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान lyrics in marathi

Tujhe Naam Ale Othi Lyrics – Ajit Kadkade | भाव अंतरीचे हळवे

धन्य धन्य जन्म ज्याचा अभंग | dhanya dhanya janma jyacha lyrics in marathi

man trupt zale ahe tuzya | मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने lyrics in Marathi

विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी | Vitthal tal vitthal dindi Lyrics in Marathi

मी निघालो तुम्ही येता का | mi nighalo tumhi yeta ka song lyrics | साई भजन lyrics in Marathi