गोपाळकाला, दहीहंडी किंवा श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी खास मराठी पारंपरिक गवळण! "जातो यमुनेच्या काठी" या गोड गवळणीचे संपूर्ण lyrics वाचा Roman Marathi मध्ये. Enjoy traditional Krishna Bhajan lyrics in Minglish perfect for festival celebrations and devotional playlists. जातो यमुनेच्या काठी हा येतो आमुच्या पाठी रोज अडवितो आमुची वाट तुझा कान्हा ग फोडीतो दह्याचे माठ || धृ || रोज मस्करी माझी करितो ,माठ माझे ओढूनी घेतो लाज लज्जा सोडूनि फिरतो ,कधी अचानक घरात घुसतो किती सांगू बाई याला , या नंदाच्या पोराला हा सुटला ग मोकाट || १ || येता जाता काढी आमुची ,वाटे मध्ये खोडी दह्या दुधाच्यासाठी कान्हा , लावी लाडी गोडी काय करावे ग याला किती सांगावे ग याला नाही सोडीत अमुची पाठ || २ || सुटल्या ग याच्या त्रासा , गवळ्याच्या ह्या पोरी घरा मध्ये शिरोनी हा बाळी , करी बघा शिरजोरी असा गोकुळचा कान्हा सांगे समीर तुम्हाला भल्या भल्यांची मोडील नाट || ३ || Jato Yamunechya Kathi ha yeto amuchya pathi Roj adavito amuchi vaat Tuzha Kanha ga fodito dahyache maath || Dhruv || Roj maskari majh...