जातो यमुनेच्या काठी हा येतो आमुच्या पाठी गौळण Lyrics समीर कदम
जातो यमुनेच्या काठी हा येतो आमुच्या पाठी
रोज अडवितो आमुची वाट
तुझा कान्हा ग फोडीतो दह्याचे माठ || धृ ||
रोज मस्करी माझी करितो ,माठ माझे ओढूनी घेतो
लाज लज्जा सोडूनि फिरतो ,कधी अचानक घरात घुसतो
किती सांगू बाई याला , या नंदाच्या पोराला
हा सुटला ग मोकाट || १ ||
येता जाता काढी आमुची ,वाटे मध्ये खोडी
दह्या दुधाच्यासाठी कान्हा , लावी लाडी गोडी
काय करावे ग याला किती सांगावे ग याला
नाही सोडीत अमुची पाठ || २ ||
सुटल्या ग याच्या त्रासा , गवळ्याच्या ह्या पोरी
घरा मध्ये शिरोनी हा बाळी , करी बघा शिरजोरी
असा गोकुळचा कान्हा सांगे समीर तुम्हाला
भल्या भल्यांची मोडील नाट || ३ ||
मस्त
ReplyDelete