ओंढाळ गायी म्हणुनी हाकलून दिधली अभंग lyrics

ओंढाळ गायी म्हणुनी हाकलून दिधली
अभाग्याच्या घरी बाबा कामधेनु आली ।। धृ ।।

दारिद्रीच्या दारी कल्पवृक्ष लाविला
एरंडे म्हणुनी त्यानी फेकुनी दिधला ।। १ ।।

आंधळ्याच्या हाती परिस दिधला
लोखंड म्हणुनी तो फेकुनी दिधला ।। २ ।।

तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण
तरीच महिमा कळों येईल ।। ३ ।। 

Comments

Post a Comment

Jara tumhi kahi shanka astiva kiva kahi suchvyche asel tr tumhi comments krun sangu shakta