जाते मथुरा बाजारी गौळण lyrics
जाते मथुरा बाजारी
जाते मथुरा बाजारी नको अडवू आता हरी
सोड सोड ना वाट माझी थांबना
देते दहि दूध लोणी तुझ मोहना ।।धृ।।
नटखट तुरे हरी मुरारी
गोकुळची मी राधा गोरी
बरी नाही मस्करी ऐकरे कान्हा ।।
वाईट तुझी खोड नाही तुझी माझी जोड
सवय ही आता सारी तू सोड
तिन्ही सांजा झाल्या जरा तू ऐकना ।।
दूर मथुरेचा घाट सोड माझा तू रे हात
बघून लिन झाला चरणी विश्वनाथ
घेवोनिया पिचकारी उडवू नको रंग ना ।।
Nice
ReplyDelete