भाव तोचि देव अभंग lyrics
भाव तोचि देव,भाव तोचि देव संदेह नाही हो,संतांनी हा टाहो फोडीयला //धृ// भावने वाचूनी देव नाही कोठे तीर्थस्थान जरी मोठे झाले //1// निश्चय करून हृदयात देव ठेविता हा भाव काय वेची //2// खावे प्यावे ल्यावे,सर्वही करावे परी देव नोव्हे जमाखर्च कर्तेपण लेले आपुलिया बाधा कर्ता करविता हृदयातु //3// ऐसें भावनेचे साधन हे मोठे शुभा शुभ लोपे मोकळा तू //4// ऐसीं भोळी भक्ती देवास आवडे सर्व काही जोडे दत्ता म्हणे //5//