Posts

Showing posts from September, 2020

जयाचे पाहता श्री मुख अभंग lyrics

Image
  जयाचे पाहता श्री मुख हरे हो तेचि कोटी जन्म दुःख || तोहा उभा विटेवारी भक्त दास म्हणता कैवारी || वेदासी तो दुर्गम आम्हा नकळे त्याचे वर्म || ऐसा भक्त वत्सल दीना नाथ ऐका जनार्दनीचे ध्यान ||

धन्य धन्य जन्म ज्याचा अभंग lyrics

Image
  धन्य धन्य जन्म ज्याचा वारकरी पंढरीचा ।।१।। जाय नेमें पंढरीसी । चुकों नेदी तो वारीसी ।।२।। आषाढी कार्तिकी । सदा नाम गाय मुखीं ।।३।। एकाजर्नाधनी करी वारी । धन्य तोचि बा संसारी ।।४।।

केला मातीचा पशुपति अभंग lyrics

Image
  केला मातीचा पशुपती परी मातीस काय महती ।। शिव पूजा शिव पूजा शिव पूजा मातीस पावे माती माझी माती माझी माती माझी मातीस मावे तयसे पूजती आंम्हा संत पूजा घेतो भगवंत आम्ही किंकर संतांचे दास संत पदवी नको आंम्हास ।। केला पाषाणाचा विष्णू परी पाषाण नोव्हे विष्णू विष्णू पूजा विष्णुसी अरपे पाषाण राहे पाषाण रूपे।। केली काशाची जगदंबा   परी कासे नोव्हे अंबा पूजा अंबेची अंबेला घेणे कासे राहे पणे।। ब्राहन्मंनद पूर्णा माझे  तुका म्हणे केली कांजी ज्याची पूजा त्याने घेणे  आम्ही पाषाण रूपे राहणे।

संपत्ती सोहळा न आवडे मनाला अभंग lyrics

Image
  संपत्ती सोहळा न आवडे मनाला । लागला हा छंद पंढरीचा । जावे पंढरीसी आवडे मनासी । करी एकादसी आषाढीची । तुका म्हणे ऐसी आर्त ज्याच्या मनी । त्याची चक्रपाणी वाट पाहे ।

सुंदरते ध्यान बैसे सिंहसिनी अभंग lyrics

Image
  सुंदरते ध्यान बैसे सिंहसिनी वामनगी नंदनी जनकाची || दक्षिनेसी उभा बंधू लक्षुमान भरत शत्रुघ्न व कैकयी सुत || सन्मुख तो उभा मारुती बलभीम जपे राम नाम सर्व काळ || तुका म्हणे माझा श्रीरामाचे ध्यान जीव लिंबे लोन उतरुण ||

हे भगवंता दिन दयाळा अभंग lyrics

Image
हे भगवंता दिन दयाळा याच क्षणी तू पाव सत्य नारायणा माझी नवका किनाऱ्याला लाव || आज भयानक सुटला वारा सुटला वारा देवा नाही निवारा नावका माझी हातून निघाली याच क्षणीं तू धाव || तुज चिंता या दिन जनाची कशी दया नाही देवा भोळ्या जीवाची नवका माझी पार बुडाली तुजला नाही ठाव || तुझ्या पामराला नको दूर लोटू सांग किनारा देवा कैसा मी गाठू भय नाही चिंता तुमचे असता हृदय पता वर नाव ||

गोकुळाला बाई गोकुळाला लावी वेड तुझा कान्हा

Image
  गोकुळाला बाई गोकुळाला लावी वेड तुझा कान्हा || नवनीत चोळी करी मस्करी रंग भोरोनी मारी पिचकारी चालताना तुझा श्रीहरी घालितो धिंगाणा || जमवुनी साऱ्या गोकुळच्या पोरी नदी किनारी खेळे बा हरी चालताना तुझा श्रीहरी घालितो धिंगाणा || एका जनार्दनी यशोदेचा कान्हा कुठं वर सोसु मी याचा धिंगाणा चालताना तुझा श्रीहरी घालितो धिंगाणा ||

चला पंढरपूराला जाऊया lyrics in marathi

Image
  चला पंढरपूराला जाऊया पांडुरंगाचे दर्शन घेऊया ।।धृ।। आषाढिला कार्तिकीला भाविक होतील गोळा चंद्रभागेच्या काठावरती वारकळ्यांचा मेळा त्यांच्या संगती पंचपदी गाऊया ।।१।। गळ्यात घालुनी तुळशी माळ खांद्यावरती फेटा मुक्तामाळा झाडाखाली कणी भाकरी कोंडा सारे मुखाने एक मुखे खाऊया ।।२।। वीणा चिपळी टाळा संगे मृदंग होई दंग कमरेवरती हात ठेवूनि नाचे पांडुरंग डोळे भरून एकमुखे पाहूया ।।३।।

Join whatsapp channel

recent posts

Loading recent posts...