केला मातीचा पशुपति अभंग lyrics
केला मातीचा पशुपती
परी मातीस काय महती ।।
शिव पूजा शिव पूजा शिव पूजा मातीस पावे
माती माझी माती माझी माती माझी मातीस मावे
तयसे पूजती आंम्हा संत पूजा घेतो भगवंत
आम्ही किंकर संतांचे दास संत पदवी नको आंम्हास ।।
केला पाषाणाचा विष्णू परी पाषाण नोव्हे विष्णू
विष्णू पूजा विष्णुसी अरपे पाषाण राहे पाषाण रूपे।।
केली काशाची जगदंबा परी कासे नोव्हे अंबा
पूजा अंबेची अंबेला घेणे कासे राहे पणे।।
ब्राहन्मंनद पूर्णा माझे तुका म्हणे केली कांजी
ज्याची पूजा त्याने घेणे आम्ही पाषाण रूपे राहणे।
Nice
ReplyDelete