गोकुळाला बाई गोकुळाला लावी वेड तुझा कान्हा
गोकुळाला बाई गोकुळाला
लावी वेड तुझा कान्हा ||
नवनीत चोळी करी मस्करी
रंग भोरोनी मारी पिचकारी
चालताना तुझा श्रीहरी
घालितो धिंगाणा ||
जमवुनी साऱ्या गोकुळच्या पोरी
नदी किनारी खेळे बा हरी
चालताना तुझा श्रीहरी
घालितो धिंगाणा ||
एका जनार्दनी यशोदेचा कान्हा
कुठं वर सोसु मी याचा धिंगाणा
चालताना तुझा श्रीहरी
घालितो धिंगाणा ||
Comments
Post a Comment
Jara tumhi kahi shanka astiva kiva kahi suchvyche asel tr tumhi comments krun sangu shakta