संत तुकाराम महाराज lyrics
गोड तुझे रूप गोड तुझे नाम ||
सादा माझे डोळा जडो तुझी मूर्ती
रखुमाई चा पती सोयरिया ||
विठू माऊली हाचि वर देई
संचारुनी येई हृदयी माझ्या ||
तुका म्हणे काही न मागे आणिक
तुझे पायी सुख सर्व आहे
धन्य अंजनीचा सुता, ||
नाम त्याचे हनुमंता || धृ ||
ज्याने शोधियेली लंका ||
सीताराम भेटविला || १ ||
द्रोणागिरी तो आणिला ||
लक्ष्मण वाचविला || २ ||
यैसा मारुती उपकारी ||
तुका लोळे चरणावरी |3|
चाले हें शरीर कोणाचिये सत
कोण बोलविते हरीवीण ॥१॥
तयाचें भजन चुको नको ॥२॥
मानसाची देव चालवी अहंता ।
मीचि एक कर्तां म्हणोनियां ॥३||
वृक्षाचेंही पान हाले ज्याची सत्ता ।
राहिली अहंता मग कोठें ॥४॥
तुका म्हणे विठो भरला सबाहीं ।
तया उणें काहीं चराचरीं ॥५॥
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार
उभा कटी कर ठेवुनिया ||
तेणें माझ्या चित्ता होय समाधान
वाटतें चरण न सोडावे ||
मुखे गातो गीत वाजवतो टाळी
नाचतो राऊळी प्रेमसुखें ||
तुका म्हणे मज तुझ्या नामापुढे
तुच्छ हे बापुडे सकळही ||
सुंदरते ध्यान बैसे सिंहसिनी
वामनगी नंदनी जनकाची ||
दक्षिनेसी उभा बंधू लक्षुमान
भरत शत्रुघ्न व कैकयी सुत ||
सन्मुख तो उभा मारुती बलभीम
जपे राम नाम सर्व काळ ||
तुका म्हणे माझा श्रीरामाचे ध्यान
जीव लिंबे लोन उतरुण ||
Comments
Post a Comment
Jara tumhi kahi shanka astiva kiva kahi suchvyche asel tr tumhi comments krun sangu shakta