संत नामदेव महाराज
Sant namdev abhang gavlan bhajan lyrics
पाहू द्या रे मज विठोबाचे मुख
लागलीसे भूक डोळां माझ्या ॥
कस्तुरी कुंकुम भरोनिया ताटी
अंगी बरवी उटी गोपाळाच्या ॥
जाई-जुई पुष्पे गुंफुनिया माळा
घालू घननीळा आवडिने ॥
नामा ह्मणे विठो पंढरीचा राणा
डोळिंया पारण होत असे ॥
तिन्ही सांजा झाल्या गाई घरी आल्या
नजर रोखुनी राधा झाली बावरी
कसा येईना ग हरी अजुनी ||
खेळायला सांगुनी गेला भर दुपारी वेळेला
अजुनी कैसा येईना वेढा पिसा जीव झाला ||
घरो घरी राधा शोधूनि आली
येता जाता सवंगड्यांना विचारून हरघडी||
कुणी सांगा सांगा ,सांगा हो धडतरी
कुणी पहिला का हरी , कुणी पहिला का हरी
नामा म्हणे किती छळसी भक्तांना
जीव व्यकुळ तुझं वीण हरी ||
पाहिला सखा पांडुरंग
जीविचा जीव लाग
डोळे भारी पहिला सखा पांडुरंग ।
गळा शोभे हार मंजरीचा तुरा
कर्ण रत्न माळा झळाळीत ।
विटेवरी नीट गोमटी पाऊले
त्यावरी ठेविले मस्तक म्या ।
नाम्याचा धनी भुकेलासी घाली हो
आनंदी दिवाळी आजी आली ।
Comments
Post a Comment
Jara tumhi kahi shanka astiva kiva kahi suchvyche asel tr tumhi comments krun sangu shakta