Durga mate daya tuzi re gajar lyrics krishana pawar
दुर्गा माते दया तुजीरे भवभय चिंता हारी आंबे आलो तुझ्या दरबारी || कोल्हापूरी तू लक्ष्मी माता माउलवासी अंबा तुळजाभवानी तुळजापूरची तूच असे जगदंबा संतोषी मा दुर्गाकाली तुझीच रूपे सारी आंबे आलो तुझ्या दरबारी || थकले जेथे ब्रम्ह तिथे तू अवतरली काया खेळ जगाचा तुझ्या मुळे तू ब्रह्मची पडछाया तू विश्वाची आहे जननी महिमा ही तवन्यारी आंबे आलो तुझ्या दरबारी || आली विपत्ती जेव्हा जेव्हा धाऊनी तू आली दृष्ट दैत्य हे नष्ट कराया अष्टभुजा तू झाली सिंहावरती स्वार होऊनी महिषासुर सवारी आंबे आलो तुझ्या दरबारी ||