Tuzhi Krupa Tari Ya Jaga lyrics तुझी कृपा तारी या जगा – गणपती अभंग (अजित कडकडे)
हा सुंदर गणपती अभंग शांताराम नांदगावकर यांनी रचला असून अजित कडकडे यांच्या आवाजात अत्यंत भक्तिपूर्ण भावनेने सादर करण्यात आला आहे. या अभंगात गणरायाच्या कृपेची महती आणि भक्तांच्या जीवनातील त्याच्या आशीर्वादाचे महत्व सांगितले आहे.
गायक (Singer): अजित कडकडे
गीतकार (Lyricist): शांताराम नांदगावकर
संगीत (Music): नंदु होनप
अभंग (Marathi Lyrics):
तुझी कृपा तारी या जगा, एकतारी गाते अभंगा ।
गजानना घेई जवळी, दीन या अपंगा ॥ ॥
ताल, सुर तुझिया रंगी रंगे ।
तुझे नाम त्यात तरंगे ॥
शब्द शब्द घेई रुप ऐसे ।
विनायका श्री ओमकारा, जशी भावगंगा ॥१॥
काय नाथ माझ्या श्री गणेशा ।
तुझ्याविना नाही कुणी ईशा ॥
ठायी ठायी दिसशी तुचि देवा ।
त्रिखंडात बल्लाळेशा, तूच रक्तअंगा ॥२॥
जन्मोजन्मी व्हावी तुझी सेवा ।
अशी मती द्यावी मज देवा ॥
सर्व दुःख, चिंता हारी आता ।
तुझा स्पर्श लागो माझ्या, तन अंतरंगा ॥३॥
Tuzhi krupa tari ya jaga, ektaari gaate abhanga.
Gajanna ghei javali, din ya apanga.
Taal, sur tujhya rangi range.
Tujhe naam tyaat tarange.
Shabd shabd ghei roop aise.
Vinayaka Shri Omkaara, jashi bhavganga. (1)
Kaay naath mazhya Shri Ganesha.
Tujhavina nahi kuni Isha.
Thaayi thaayi disshi tuchi deva.
Trikhandaat Ballaalesha, tuuch raktanga. (2)
Janmojanmi vhavi tuzhi seva.
Ashi mati dyavi maj deva.
Sarv dukh, chinta hari aata.
Tuzha sparsh lago mazhya, tan antaranga. (3)
Comments
Post a Comment
Jara tumhi kahi shanka astiva kiva kahi suchvyche asel tr tumhi comments krun sangu shakta