Posts

Showing posts from August, 2024

गणांचा तू अधीपती गौरी तनया lyrics in Marathi

         गणांचा तू अधीपती गौरी तनया गणराया गणराया गणराया गणराया बाप्पा मोरया ||ध्रु|| आली भाद्रपद मासी चतुर्थी  तुमचा स्वागतासी बहरली धरती मनो भावे नित्य तुझी भक्ती करूया  ||१|| साऱ्या भक्तांचा तूच कैवारी  तुझी कृपा असे आम्हावरी  रात्रंदिन भक्तिभावे भजन करूया  ||२|| भक्त जनानंचा भाग्यविधाता  सकलकलांचा स्वामी दाता  उमा पुत्र विद्य हरा बुद्धिविधता  ||३||

हरी मी तुझा काय केला गुन्हा gavlan lyrics in Marathi

हरी मी तुझा काय केला गुन्हा कारे रोखियली नजर ,तू जरी वाटे मजला बाळ   धरू नकोस माझा हात पुन्हा     हरी मी तुझा काय केला गुन्हा तुझा माझा सात जन्माचा जीव भावाचा  घरोबा जुना घरोबा जुना घरोबा जुना ||ध्रु||       इकडे माहेर तिकडे सांसर       हरी सोड सोड माझी वाट रे       कस सांगू भुललिया कुणा. . ||१||     घागर घेऊनी पाणीयासी जाता      हरी सोड सोड माझी घागर रे        कस सांगू भुललिया कुणा ..||२||      एका जनार्दनी समरस झाली    आणि हरी चरणी राधिका आली         कस सांगू भुललिया कुणा...||३||

हर हर हर हर हरेश्वरा करुणा नंदा नटेश्वरा lyrics in Marathi

 हर हर हर हर हरेश्वरा करुणा नंदा नटेश्वरा || भज भज मनुजा शिव शंकरा     हा भव सागर रे तरण्या || स्मरता हरी हर नित्य भाया काम क्रोध मग जातील या जन्म मरण चुकवूनी फेरा मोक्षा जाशील रेवरा. .. ||

छंद लागो जीव जीवाला lyrics in Marathi

 छंद लागो जीव जीवाला छंद लागो जीव जीवाला श्री हरी नारायणाचा || ध्रु || लागला तो छंद हरीचा कैवारीतो भक्तजनाचा ||१|| तव नामाचा लागला छंद  जय नारायण हरी गोविंद ||२|| Chand lago jiva jivala  Shree Hari narayanacha || Lagala to Chand Haricha  Kaivairito bhaktjanacha || Tav namacha lagla Chand  Jay Narayan Hari Govind ||

देखिला मी देव चंद्रभागे तिरी lyrics in marathi

 देखीला मी देव चंद्र भागे तीरी देखीला मी देव चंद्र भागे तीरी  उभा विटेवरी पांढुरंग पांढुरंग || जाहले समाधान पाहुनिय डोळा  वैखुंटीचा सावळा मायबाप || नाम त्याचे असे पतित पावन  देई उद्धरून मोक्षधाम || जयदास म्हणे मन माझे डोले  सर्वांघटी बोले नारायणा ||

शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान lyrics in marathi

Image
 शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान ll गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा पायात नुपूर छान, आवडते बेलाचे पान ll जटेतुन वाहे झुळ झुळ गंगा डोक्यावर चांदोबा छान, आवडते बेलाचे पान ll महादेवाच्या हातात डमरू त्रिशूल पायात खडावा छान , आवडते बेलाचे पान ll बेलपुष्पांवरी शंकराची प्रीती कपाळाला भस्म शोभे छान, आवडते बेलाचे पान ll घेऊन रूप भिल्लींण आली कैलासी नाचत छान , आवडते बेलाचे पान ll डोळे उघडुन शंकर पही  पार्वती दिसतीया छान , आवडते बेलाचे पान || शंकराच्या मांडीवरती गिरिजा गणपती  शोभून दिसतोय छान,आवडते बेलाचे पान || WhatsApp वर शेअर करा Facebook वर शेअर करा

Join whatsapp channel

recent posts

Loading recent posts...