Posts

Showing posts from October, 2018

देखोनिया तुझ्या रूपाचा आकार

Image
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार उभा कटी कर ठेवुनिया || तेणें माझ्या चित्ता होय समाधान वाटतें चरण न सोडावे || मुखे गातो गीत वाजवतो टाळी नाचतो राऊळी प्रेमसुखें || तुका म्हणे मज तुझ्या नामापुढे तुच्छ हे बापुडे सकळही ||

गोड तुझे रूप गोड तुझे नाम

देई मज प्रेम सर्वकाळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम || सादा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाई चा पती सोयरिया || विठू माऊली हाचि वर देई संचारुनी येई हृदयी माझ्या || तुका म्हणे काही न मागे आणिक तुझे पायी सुख सर्व आहे

किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या

किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या || धृ || भूमीवरी पडावे आकाश पांघरावे | पायाकडे पहावे या झोपडीत माझ्या || १ ||

माझे मन गोविंदा रंगले अभंग

माझे मन गोविंदी रंगले तुझी सेवा करिन मनोभावें || नवसीए नवसीए हो पंढरीचे दैवत विठ्ठले नवसीए || बापरकुमा देवी वरे,  विठ्ठले चित्त चैतन्य सोडूनि देरे     ||

भाविकांसाठी उभा विठू कैवल्याचा गाभा

भाविकांसाठी उभा विठू कैवल्याचा गाभा | युगे झाली अठाविस भक्त पुंडलिका पाठीस || न मानी अवघा शिण उभा तिष्ठत अजून || ऐसा कृपाळू दिनाचा भानू दास म्हणे साचा ||

Join whatsapp channel

recent posts

Loading recent posts...