Posts

Showing posts from December, 2021

मंगलारंभी तुझी प्रार्थना अभंग lyrics

Image
  मंगलारंभी तुझी प्रार्थना मंगलारंभी तुझी प्रार्थना वनदीतो मी तव चरणा प्रसन्न व्हा गजवदना ।।धृ।। विघ्ने पळती तुझिया स्मरणा तुजविण शरण मी जाऊ कोना हे गजवदना या तुम्ही स्मरणा आनंद अमुचा मन ।।१।। भक्ती भावे पूजन चाले हर्ष भराने हे मन डोले प्रसन्न होऊन दर्शन द्यावे ही आमुची प्रार्थना ।।२।। हे गजवदना आलो चरणा देवा आलो चरणा आशीर्वाद हो द्या तुम्ही सकळा कृपा तुझी मोरया ।।३।।

रूप सावळे सुंदर रूपक Lyrics in marathi

रूप सावळे सुंदर रूप सावळे सुंदर  कानी कुंडले मकरा-कार || धृ || तो हा पंढरीचा राणा नकळे योगियांच्या ध्याना || १ || पितांबर वैजयंती माथा मुकुट शोभे दिप्ती || २ || एका जनार्दनी ध्यान विठे पाऊले समान || ३ ||

याचे हातीचा वेणू कुणी घ्यागे गौळण lyrics

याचे हातीचा वेणू कुणी घ्यागे गौळण  याचे हातीचा वेणू कुणी घ्यागे बाई घ्यागे सई घ्यागे ।।धृ।। घरी करीत होते काम धंदा वेणू वाजविले नंदाचिये नंदा विसरले मी काम धंदा ।।१।। घरी सासुचा जाच माझा भारी जावा नंदा नांदती परोपरी ।।२।। तान्हे बालक आले कुणी घरा घरी सासू सासरा म्हातारा याच्या मुरलीने जीव झाला घाबरा ।।३।। वेणू न्हवे विषमज वाटे नाद ऐकता काम मनी दाटे मध्वनाथाची मूर्ती हृदयी भेटे ।।४।।